शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

३३ वर्षांपासून ओंकारेश्वर मंदिराचा कारभार महिलांच्या हाती

By प्रशांत तेलवाडकर | Updated: September 8, 2023 18:45 IST

नारीशक्ती, स्वच्छता, शिस्त व भक्तीचे आदर्श मॉडेल

छत्रपती संभाजीनगर : उल्कानगरीतील ओंकारेश्वर महादेव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व व्यवस्थापन मागील ३३ वर्षांपासून महिलांच्या हाती आहे. मंदिराच्या अर्धा एकर परिसरात स्वच्छता, शिस्तीची कडकपणे अंमलबजावणी केली जाते. सोमवारी, ४ सप्टेंबरला या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.

मंदिरांचे व्यवस्थापन सांभाळणे साधे काम नाही. कारण चांगले उपक्रम राबविले तर कोणी कौतुक करणार नाही. पण एखादी अनवधानाने चूक झाली तर त्यावर ताशेरे ओढण्यासाठी हजारो जण पुढे येतात. मात्र हे एक आदर्श मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. मंदिरात पाऊल ठेवताच भगवान शंकराची भव्य मूर्ती आणि शांत, मांगल्यमय वातावरणाने मन प्रसन्न होते. येथे ओंकारेश्वर शिवलिंग व त्यावर शेषनागाचे दर्शन होते. शिवलिंगाशिवाय गणपती, पार्वती, श्रीराम, लक्ष्मण, सीता, वैष्णोदेवी, श्री दत्तात्रय, विठ्ठल रुख्माई, श्री राधा-कृष्ण, श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, श्री गजानन महाराजांचे दर्शन घडते.

पदोपदी नियमावलीमहिला विश्वस्त मंडळाचा शिस्तीचा कारभार आहे. याची पदोपदी जाणीव होते. कारण, भाविकांनी काय करावे व काय करू नये, याची सूचना देणाऱ्या पाट्या जागोजागी आहेत.

मंदिराचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या कोण?अध्यक्ष स्नेहलता ठाकूर, उपाध्यक्ष जयश्री कुलकर्णी, कोषाध्यक्ष सुनीता कुलकर्णी, सचिव अंजली कुलकर्णी, उपसचिव अनुराधा बियाणी, सदस्य लता कुलकर्णी, शैला भालेराव, मनीषा खंडाळकर, कल्पना सुरडकर, ज्योती गीर, संगीता जोजारे, छाया ठाकूर, स्मिता गरुड या ओंकारेश्वर मंदिराचे यशस्वीपणे व्यवस्थापन सांभाळतात.

ठेवीवरील व्याजातून वार्षिक उत्सव साजराकाही दानशूर भाविकांनी देणगी दिल्या आहेत. त्या ठेवीरूपात बँकेत जमा आहेत. या व्याजातून वार्षिक उत्सव साजरा केला जातो. कारभार पारदर्शक असल्याने भाविकही सढळ हाताने देणग्या देतात.

कुराण, बायबलसह सर्व धार्मिक ग्रंथ ग्रंथालयातओंकारेश्वर मंदिराच्या बाजूला हरिहरेश्वर पारायण हॉल व प्रसादालय उभारण्यात आले आहे. याच ठिकाणी ओकारेश्वर ग्रंथालय आहे. यात हिंदूंचे सर्व धार्मिक ग्रंथ आहेतच; शिवाय कुराण, बायबलही येथे तेवढ्याच आदराने ठेवण्यात आले आहे, हे विशेष.

टॅग्स :Shravan Specialश्रावण स्पेशलAurangabadऔरंगाबाद