शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात वाढतोय ओमायक्राॅनचा विळखा, ८ रुग्णांचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 12:21 IST

Omicron Variant in Marathwada: उस्मानाबादमध्ये ५ नवे रुग्ण; औरंगाबाद, जालना, लातूरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाची वाढ

औरंगाबाद : मराठवाड्यात ओमायक्राॅनचा विळखा वाढत असून, रविवारी ओमायक्राॅनबाधित ८ रुग्णांचे निदान झाले. यामध्ये सर्वाधिक ५ रुग्ण हे उस्मानाबादमधील असून, औरंगाबाद, जालना, लातूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला. औरंगाबादमधील रुग्ण हा २४ वर्षीय तरुण असून, तो काही दिवसांपूर्वीच अमेरिकेहून परतला होता. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून, रुग्ण गृह अलगीकरणामध्ये आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले होते. यामध्ये रविवारी जालन्याचीही भर पडली. तर औरंगाबादमध्ये आतापर्यंत २ रुग्णांचे निदान झाले होते. हे दोन्ही रुग्ण उपचार घेऊन ओमायक्राॅनमुक्त झाले आहेत. परंतु, औरंगाबादमध्ये रविवारी आणखी एका रुग्णाची वाढ झाली.

औरंगाबादमधील २४ वर्षीय रुग्ण २४ डिसेंबर रोजी अमेरिकेहून परतला होता. दिल्लीमार्गे औरंगाबादमध्ये दाखल झाल्यानंतर त्याच्या कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर शहराबाहेर जाण्यासाठी २९ डिसेंबर रोजी कोरोना तपासणी केली असता, त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यानंतर त्याचा नमुना जिनोमिक सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आला. त्याचा अहवाल रविवारी आला आणि त्यातून हा तरुण ओमायक्राॅनबाधित असल्याचे निदान झाले. कोरोना पाॅझिटिव्ह येऊन १० दिवस झाले असून, त्याची प्रकृती चांगली असल्याची माहिती मनपाच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

रुग्णाची प्रकृती स्थिरऔरंगाबादमधील २४ वर्षीय ओमायक्राॅनबाधित तरुण हा सध्या गृह अलगीकरणामध्ये आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या आई-वडिलांच्या तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याची सोमवारी (दि. १०) आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वाॅर रुम प्रमुख डाॅ. मेघा जोगदंड यांनी दिली.

मराठवाड्यातील एकूण ओमायक्राॅनबाधितजिल्हा - एकूण रुग्ण- उस्मानाबाद - ११- लातूर - २- नांदेड - ३-औरंगाबाद - ३- जालना - १

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाcorona virusकोरोना वायरस बातम्या