शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

मराठवाड्यातून ओमायक्रॉन हद्दपार; रुग्णसंख्या शून्यावर आल्याने मोठा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2022 17:07 IST

Omicron Variant : रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात ( Corona In Marathwada ) दीड महिन्यात ओमायक्रॉनचे (Omicron Variant) एकूण ५१ रुग्ण आढळले होते. त्या सगळ्या रुग्णांवर उपचार करण्यात आले. ते सर्व बरे झाले असून, सध्या विभागात ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही. विभागात ओमायक्रॉन रुग्णसंख्या शून्यावर आली आहे. सोबतच कोरोनाची रुग्णसंख्यादेखील कमी होत चालल्यामुळे विभागासाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

विभागात मागील २४ तासांत कोरोनाचे ५७० रुग्ण आढळले. विभागात सध्या एकूण ७ हजार ५०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येमुळे ४०० कोटींची मागणी प्रशासनाने शासनाकडे केली होती. आजवर डीपीसीतूनच उपचार खर्च करावा लागला. औरंगाबादेत १७४, नांदेड जिल्ह्यात ९६, लातूरमध्ये १०२, जालन्यात २१, हिंगोली ३३, बीडमध्ये १५, परभणीत ४४ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ८५ असे ५७० कोरोनाबाधित रुग्ण गेल्या २४ तासांत आढळून आले.

विभागात रिकव्हरी रेट ९६.४५ टक्के झाला आहे तर २.३० टक्के मृत्यूदर आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्यामुळे संस्थात्मक अलगीकरण केलेल्या रुग्णांची संख्या घटली आहे. सध्या १ हजार ६२ रुग्ण क्वारंटाइन आहेत. तरी घरी ७ हजार ६५९ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरांच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्णसंख्या जास्त आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडाOmicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या