शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

यशोधरा कॉलनीत जुन्याच ड्रेनेज लाइनमुळे जलवाहिनीला दुर्गंधीयुक्त पाणी; बदलण्यास मुहूर्त कधी?

By साहेबराव हिवराळे | Updated: August 11, 2023 19:00 IST

आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची भीती; यशोधरा कॉलनीत सुरुवातीला टाकण्यात आलेली ड्रेनेज लाइन कमी व्यासाची व जीर्ण बनली आहे.

छत्रपती संभाजीनगर : यशोधरा कॉलनी व वैशालीनगरातील नागरिकांना ड्रेनेज चोकअपच्या त्रासाने डोकेदुखी व मळमळीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर वाहणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यातून वाट शोधत घर गाठावे लागत आहे.

मनपा अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणाऱ्यांना नवीन मोठ्या व्यासाची ड्रेनेजलाइन मंजूर असून लवकरच टाकू, असे गाजर दाखवले जाते; पण या कामाला मुहूर्त कधी लागणार, असे चार महिन्यांपासून आशावादी नागरिक विचारत आहेत.

मनपाचा कर नागरिक नियमितपणे आदा करतात; परंतु सेवासुविधांसाठी मनपाच्या दरबारी पायपीट करावी लागते. लोकप्रतिनिधींच्या निधीतून रस्त्याचे सिमेंटीकरण झाले, सामाजिक सभागृह, इ. कामे येथे करण्यात आलेली आहेत; परंतु ड्रेनेज लाइनचा प्रश्न रोगराई पसरवू शकतो, अशी भीती रहिवासी रघुनाथ गिमेकर, कमलाकर पगारे, निवृत्त मुख्याध्यापक साळवे यांनी व्यक्त केली.

जुनी ड्रेनेज लाइन बदला...यशोधरा कॉलनीत सुरुवातीला टाकण्यात आलेली ड्रेनेज लाइन कमी व्यासाची व जीर्ण बनली आहे. महिन्यातून तीनदा ड्रेनेज सफाई कर्मचारी येऊन दुरुस्ती करतात; परंतु परिस्थितीत सुधारणा नाही.- महेंद्र साळवे, रहिवासी

डासांमुळे आरोग्यास धोका...अस्वच्छतेमुळे डासांचा त्रास सातत्याने होत असल्याने आरोग्यास धोका आहे. औषध व धूरफवारणी कर्मचारी चुकूनही या परिसरात फिरकत नसल्याने थंडीतापाचे रुग्ण आढळून येतात. परिसराकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन प्रश्न सोडवावेत.- बाळासाहेब ठोंबरे, रहिवासी

उद्यानाची गरजकॉलनीत उद्यानासाठी जागा असून, तेथे सामाजिक कार्यक्रम घेण्यात येतात. येथे उद्यान विकसित करावे, खेळणी बसवावीत.- प्रा. रत्नाकर पगारे, रहिवासी

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका