शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
5
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
6
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
7
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
8
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
9
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
10
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
11
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
12
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
13
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
14
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
15
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
16
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
17
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
18
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
19
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
20
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?

जुन्या वादातून सराईत गुंड भुऱ्याने तरुणाला भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 4:02 AM

औरंगाबाद : मृताने आईच्या समोर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून सराईत गुंडाने सोबत नशा करणाऱ्या तरुणाचा संजयनगर सी-७ गल्लीच्या ...

औरंगाबाद : मृताने आईच्या समोर शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून सराईत गुंडाने सोबत नशा करणाऱ्या तरुणाचा संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ (बायजीपुरा) चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरुवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मध्यरात्री १२ वाजताच्या दरम्यान मृत्यू झाला. जिन्सी पोलिसांच्या पथकाने गुंड आरोपीला घटनेनंतर अवघ्या एक तासातच बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजयनगर, बायजीपुरा, कैलाशनगर येथे दहशत असलेला शेख अरबाज ऊर्फ विशाल ऊर्फ भुऱ्या (२४, रा. गौसिया मशीदजवळ, कैलाशनगर) हा दादागिरीसाठी प्रसिद्ध असून, रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. मृत मंगेश दिनकर माळोदे (२८, रा. गल्ली नंबर बी-७, संजयनगर) हा भुऱ्याचा मित्र आहे. दोघे सोबत नशा करीत होते. मंगेश मजुरी करून त्याचा उदरनिर्वाह करायचा. काही दिवसांपूर्वी दोघात वाद झाला होता. परंतु नंतर माफी मागून तो मिटला होता. दोन-तीन दिवसांपूर्वी मंगेशने अरबाज ऊर्फ भुऱ्याला कोणत्या तरी कारणाने त्याच्या आईसमोर शिवीगाळ केली. त्याचाच रा. भुऱ्याने मनात धरला. त्यानंतर त्याने गुरुवारी रात्री ९.३० वाजता मंगेशला संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ फोन करून बोलवून घेतले. तेव्हा पुन्हा दोघात वाद झाला. यावेळी भुऱ्याने जवळ असलेल्या चाकू बाहेर काढत मंगेशच्या डाव्या हातावर, डाव्या पायाच्या मांडीवर वार करून गंभीर जखमी केले. हल्ला झाल्यानंतर मंगेश मोठमोठ्याने ओरडला. तेव्हा भुऱ्या निघून गेला. यानंतर मंगेशला घाटी रुग्णालयात उपचारासाठी नातेवाइकांनी दाखल केले. घटनास्थळीची अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे घाटीत उपचार सुरू असतानाच मंगेशचा मध्यरात्री १२ वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी मंगेशचा भाऊ उमेश दिनकर मोळोदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शेख अरबाज ऊर्फ विशाल ऊर्फ भुऱ्या याच्या विराेधात पोलीस उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर यांनी गुन्हा नोंदवला. अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश मयेकर करीत आहेत.

चौकट,

अवघ्या एका तासात आरोपीला अटक

संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यानंतर जिन्सी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक गोकूळ ठाकूर यांच्यासह इतरांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर पीएसआय ठाकूर यांनी खबऱ्यामार्फत भुऱ्याच्या ठावठिकाणाची माहिती घेतली. तेव्हा भुऱ्या हा कैलाशनगर भागात असल्याचे समजले. यावरून पीएसआय ठाकूर, पोलीस कर्मचारी शाहेद खान पठाण, संतोष बमनाथ यांनी कैलाशनगरमध्ये धाव घेत मोकळ्या मैदानात बसलेल्या भुऱ्याला अवघ्या एका तासातच अटक केली. अटक केल्यानंतर त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात येत असतानाच मंगेशच्या मृत्यूची माहिती मिळाली. यानंतर खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

चौकट,

नशेबाज गुन्हेगार

शेख आरबाज ऊर्फ विशाल उर्फ भुऱ्या हा सराईत गुन्हेगार आहे. त्याला दारूसह गांजाचे व्यसन आहे. व्यसन करण्यासाठी तो कोणालाही अडवून पैसे घेत होता. अनेकांना मारहाणही करायचा. त्याच्यावर चार ते पाच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मृत मंगेश हा भुऱ्यासोबत दारू पीत असल्यामुळे दोघांची मैत्री होती. या मैत्रीतूनच निर्माण झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

चौकट,

घटनास्थळाला वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट

संजयनगर सी-७ गल्लीच्या कोपऱ्याजवळ भुऱ्याने मंगेशला भोसकले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला होता. या घटनास्थळाला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे, राजेश मयेकर आदींनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पुरावे गोळा करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांनी केल्या.