शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

तेल कंपन्यांनाच लावले ‘तेल’; मनमाडहून येणाऱ्या टँकरमधून रस्त्यातच पेट्रोल व डिझेलची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 18:46 IST

धूळे-सोलापूर महामार्गावरील बंद पडलेल्या ढाब्यापासून १० मीटर अंतरावर इंधन चोरीचा प्रकार सुरू होता.

ठळक मुद्देया प्रकरणात ६ जणांना अटक करण्यात आली आहेपोलिसांनी सुमारे ३० लाखांचा ऐवज जप्त केला

औरंगाबाद : सार्वजनिक क्षेत्रातील हिंदुस्थान पेट्रोलियम  कंपनीच्या टँकरमधून डिझेल चोरून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने जांभाळा येथे धाड टाकून पर्दाफाश केला.  या कारवाईत ६  जणांना ताब्यात घेण्यात आले. टँकर, स्कॉर्पिओ जीप आणि ७ ड्रम, डिझेलच्या कॅन, असा सुमारे ४० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

नाशिक येथील पेट्रोल, डिझेल केंद्रावरून मराठवाड्यातील अनेक पंपांवर इंधन पुरवठा केला जातो. इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचालकांना हाताशी धरून त्यातील पेट्रोल, डिझेल जांभाळा शिवारात काढण्यात येते. त्यानंतर हे इंधन अन्य वाहनचालकांना विक्री केले जाते. याचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या विशेष पथकाला मिळाली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, हवालदार इमरान पठाण, मनोज विखणकर, विजय निकम,  विनोद पवार,  विठ्ठल आडे यांच्या पथकाने जांभाळा शिवारातील संशयित भूखंडावर धाड टाकली. तेव्हा तेथे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या टँकरमधून डिझेल काढण्याचे काम सुरू होते. तेथे असलेल्या सहा जणांनी  पळून  जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. याप्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हायवेपासून १० मीटर अंतरावर अड्डा धूळे-सोलापूर महामार्गावरील बंद पडलेल्या ढाब्यापासून १० मीटर अंतरावर इंधन चोरीचा प्रकार सुरू होता. तेथे  २४ तासांत आठ ते दहा  टँकर येऊन उभे राहत. शासनाने लावलेले अधिकृत सील तोडून टँकरमधील पेट्रोल अथवा डिझेल काढले जात असल्याचे निदर्शनास आले.

पुरवठा अधिकाऱ्यांचे मोबाईल बंद या कारवाईनंतर पथकातील पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी आणि तालुका पुरवठा अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर संपर्क साधून या कारवाईची माहिती दिली. पंचनामा करून पुढील कारवाई करण्यासाठी येण्यास सांगितले. मात्र, या अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद केल्याचे समोर आले. 

मुख्य आरोपी इलियाससह ६ जणांना अटक टँकरचालकाकडून डिझेल खरेदी करून विक्री करणारा अड्डा चालक इलियास खान आजम खान (५४, रा. लोटाकारंजा) याच्यासह टँकरचालक शेख अब्दुल्ला शेख अहमद (४०, रा. लिपाणी आडगाव), साजेद खान साहेब खान (३०, रा. कैसर कॉलनी), शेख जाहेद शेख हमीद (२५, बायजीपुरा), शेख मुक्तार वजीर शेख (बालानगर), अश्फाक हुसेन हुसेनभाई (४८, रा. लोटाकारंजा) या आरोपींना पोलिसांनी अटक केली. 

अशी व्हायची विक्री आरोपी टँकरचालकाकडून निम्म्या दराने डिझेल खरेदी करून ६० रुपये प्रति लिटरप्रमाणे ते विक्री करीत असत. आरोपी एका ग्राहकाला कमीत कमी ३५ लिटरच्या कॅनचीच विक्री करीत असत. जेसीबी, हायवाचालक आणि  जडवाहनमालक त्यांचे ग्राहक होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. याशिवाय आज तेथे डिझेल खरेदी करण्यासाठी आलेला स्कॉर्पिओ चालकही पोलिसांच्या हाती लागला. रोख रकमेसह ४० लाख ११ हजार ५२३ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी या कारवाईत जप्त केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPetrolपेट्रोलDieselडिझेल