शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
2
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
3
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
4
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
5
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
6
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
7
लेख: श्रीमंत जिल्ह्यांना खुराक आणि गरीब जिल्हे मात्र उपाशीच?
8
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
9
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
10
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
11
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे
12
मोठी कारवाई! बीड सायबर ठाण्यातील वादग्रस्त PSI रणजीत कासले पोलिस खात्यातून डिसमिस
13
Usha Thakur : "पैसे, दारुच्या बदल्यात मतदान करणारे पुढच्या जन्मात उंट, मेंढ्या, कुत्रे, मांजर बनतील; जे लोकशाही...
14
बाळासाहेबांची सगळी स्वप्ने पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली; नीलम गोऱ्हे यांची सावध प्रतिक्रिया
15
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
16
IPL 2025: आईसारखी माया..!! गालावर हात फिरवून नीता अंबानींनी काढली इशान किशनची समजूत
17
मंत्री नितेश राणे यांच्या ताफ्याला दाखवले चक्क कोंबड्यांचे फोटो; सोलापूर दौऱ्यावेळी गोंधळ
18
सिद्धार्थ जाधव माझा मुलगाच! महेश मांजरेकर म्हणाले- "मी त्याच्यासाठी काहीच केलं नाही, पण त्याने..."
19
'दामिनी' मालिकेतील अभिनेत्री आठवतेय का? म्हणते - "दामिनीचा प्रभाव आजही तसाच आहे..."
20
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

अरे देवा! हृदयासाठी फायदेशीर करडी तेलाने भाववाढीचा गाठला उच्चांक

By प्रशांत तेलवाडकर | Updated: April 18, 2025 12:06 IST

मागील चार ते पाच वर्षांत करडी बीचे प्रमाण सतत कमी होत आहे. परिणामी, करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.

छत्रपती संभाजीनगर : करडीचे उत्पादन कमी आल्याने ऐन हंगामात भाव कमी होण्याऐवजी वाढले आहेत. करडी तेलाने तर आजपर्यंतचे भाववाढीचे सर्व विक्रम मोडीत काढत चक्क २६० रुपये किलोचा दर गाठला आहे.

सर्व खाद्यतेलात सर्वाेत्तम, आरोग्यदायी तेल म्हणजे करडी तेल होय. मात्र, करडी बीच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आणि त्याचा मोठा फटका तेल उत्पादनाला बसत आहे. मागील चार ते पाच वर्षांत करडी बीचे प्रमाण सतत कमी होत आहे. परिणामी, करडी तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत.

ग्राहकांनी हात आखडता घेतलाकरडी बीचा हंगाम महाशिवरात्र ते गुढीपाडव्यापर्यंत असतो. यंदा उत्पादनात ३० टक्क्यांनी घट झाल्याने करडी बी ४५ रुपये किलोहून थेट ६६ रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहे. परिणामी, महिनाभरात २० रुपयांनी महागले आहे. करडी तेल आज २४० रुपये लिटर तर किलोमागे २० रुपये वाढ होऊन २६० रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांनी करडी तेल खरेदी करण्यात हात आखडता घेेणे सुरू केले आहे.

शहरात दररोज किती विकते करडी तेलशहरात दररोज १००० ते १५०० लिटर करडी तेल विकले जाते. एकूण खाद्यतेल विक्रीत करडी तेलाची विक्री अवघे ५ ते १० टक्केच आहे.

किलो व लिटरमध्ये किती फरककरडी तेल शहरात किलो व लिटर असे दोन वजनात विकल्या जाते. एक किलो म्हणजे १००० ग्रॅम व लिटरमध्ये ९०५ ते ९१० ग्रॅम होय. लिटरपेक्षा किलोमध्ये घेतले तर ९० ग्रॅम तेल जास्त मिळते.

करडी तेल २८० रुपये किलोपर्यंत महागण्याचा अंदाजमागील वर्षी बड्या खाद्यतेल कंपन्यांकडे करडी तेलाचा साठा होता. हे खाद्यतेल फेब्रुवारीपर्यंत टिकले. पण आता बड्या खाद्यतेल कंपन्याकडे करडी बीचा साठा कमी आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या काही महिन्यात करडी तेल २८० रुपये किलोपर्यंत तर लिटरमागे २६० रुपयांपर्यंत विकल्या जाईल.- अशोक मिटकर, खाद्यतेल व्यापारी

शेंगदाणा किंवा सूर्यफूल तेलाची विक्री वाढेलकरडी तेलाच्या भावाने उच्चांक गाठल्याने ग्राहकांनी १८० ते १९० रुपये लिटर विक्री होत असलेले शेंगदाणा तेल किंवा १४४ रुपये लिटर विक्री होत असलेले सूर्यफूल तेल खरेदी करणे पसंत केले आहे.

हृदयाचे आरोग्य सुधारण्यास फायदेशीरकरडीच्या तेलात ओमेगा-६ फॅटी ॲसिडचे प्रमाण जास्त असते. जे मानवी शरीराला आवश्यक असलेले एक फायदेशीर फॅटी ॲसिड आहे. त्यात लिनोलिक ॲसिड असते. हे ॲसिड शरीरात कोलेस्ट्रेरॉलचे संतुलन राखण्यास मदत करते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासही मदत करते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरfoodअन्न