शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अरेच्या असं कसं? मनपाच्या प्रवेशद्वारावरच सुलभ शाैचालय!

By मुजीब देवणीकर | Updated: November 18, 2023 12:54 IST

टीकेची प्रचंड झोड; प्रशासनाने निर्णयात बदल करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर : महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराच्या आत सुरक्षारक्षकांचा कक्ष आहे. त्याला लागून असलेल्या खुल्या जागेवर अत्याधुनिक सुलभ शौचालय बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारपासून कामाला सुरुवात होताच कर्मचाऱ्यांना ही बाब कळाली. कर्मचाऱ्यांनीही यावर तीव्र नाराजी दर्शविली. माजी पदाधिकाऱ्यांनी तर प्रशासनावर टीकेची झोड उठविली. प्रशासनाने त्वरित निर्णयात बदल करावा, अशी मागणी करण्यात आली.

महापालिकेत चार वर्षांपासून नगरसेवक, पदाधिकारी नाहीत. त्यामुळे सर्व निर्णय प्रशासनाला घ्यावे लागत आहेत. शासनाने यापूर्वी सार्वजनिक हिताच्या निर्णयात माजी पदाधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत करावी, अशी सूचना केली होती. मात्र, कोरोना संसर्ग संपल्यावर प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील संवादही संपला. अलीकडेच प्रशासनाने जवळपास १० कोटी रुपये खर्च करून शहरात विविध ठिकाणी अत्याधुनिक शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला. महापालिका मुख्यालयातही चांगल्या शौचालयाची गरज होती. प्रशासनाने जुन्या इमारतीत प्रवेश करताना मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला पार्किंगच्या जागेवर भव्य शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. शुक्रवारी अचानक कंत्राटदाराने काम सुरू केले. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. कर्मचाऱ्यांनी माहिती घेतली तर शौचालयाचे काम असल्याचे सांगण्यात आले. प्रवेशद्वारावर कुठे शौचालय असते का, अशा शब्दात कर्मचाऱ्यांनी नाराजी दर्शविली.

अशोभनीय निर्णयशौचालय हे नेहमी कार्यालयाच्या पाठीमागे असते. प्रवेशद्वारवर नसते. महापालिकेत अनेक नागरिक, मोठे नेते, विदेशी पाहुणे येतात. दर्शनी भागात शौचालय घेणे योग्य नाही. हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे. अशोभनीय निर्णय प्रशासनाने त्वरित मागे घ्यावा. शौचालयासाठी आणखी दुसरी कोणती जागा बघावी. शेवटी या संस्थेसोबत आमची आस्था जोडलेली आहे.- नंदकुमार घाेडेले, माजी महापौर

जागा बदलणे योग्यशहराचे मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या मनपा मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर शौचालय बांधणे अतिशय चुकीचे आहे. प्रशासकांनी आपला निर्णय बदलावा. अन्यत्र जागेचा शोध घ्यावा. मुख्यालय परिसरात बरीच जागा आहे. प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक ३ येथे जागेचा शोध घ्यावा.- बापू घडमोडे, माजी महापौर

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका