शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या धसक्याने अधिकारी -कर्मचाऱ्यांचा व्हाटस् अ‍ॅप ग्रुपला रामराम  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 20:27 IST

आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर असलेल्या राजकीय ग्रुपमध्ये राहणे टाळण्याच्या सूचना

लासूर स्टेशन (औरंगाबाद) : सोशल मीडिया यंदाच्या निवडणुकीत आचारसंहितेच्या कक्षेत आल्यामुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. आचारसंहितेचा भंग करणारी एखादी राजकीय पोस्ट आपल्याला चांगलीच डोकेदुखी ठरू शकते, त्यामुळे व्हाट्सअ‍ॅप ग्रुपमधून लेफ्ट झालेले बरे, असे म्हणत अनेक शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्हाट्स अ‍ॅप ग्रुपला रामराम ठोकला आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना अपरिचित असलेल्या युवकांसह नागरिकांनी तयार केलेल्या व्हाटस् अ‍ॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतलेले आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक  पोस्ट टाकल्या जातात. परंतु आता लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भीती वाटू लागली आहे. एखादी पोस्ट आपल्या अंगलट येऊ नये म्हणून त्या पहिलेच ‘लेफ्ट’ झालेले बरे, असे म्हणून ग्रामीण भागातील अधिकारी-कर्मचारी सोशल मीडियापासून दूर जात आहेत.

आचारसंहितेच्या काळात सोशल मीडियावर असलेल्या राजकीय ग्रुपमध्ये राहणे टाळावे, अशा आम्हाला सूचना असतात. राजकीय वक्तव्यांशी आमचा काहीही संबंध नसतो. त्यामुळे निवडणूक काळात सोशल मीडियापासून बाजूला झाल्याची प्रतिक्रिया ‘आपलं लासूर सुंदर लासूर’ या व्हाटस् अ‍ॅप ग्रुपमधून बाहेर पडलेले गटविकास अधिकारी विद्याधर पाटील यांनी दिली.  

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबाद