शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्रभारी अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 00:48 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी जाहीर केलेल्या निवडणुकीत प्रभारी अधिका-यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा वादग्रस्त निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला.

ठळक मुद्देविद्यापीठ : व्यवस्थापन परिषद निवडणूक; कायद्याच्या पायमल्लीचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेसाठी जाहीर केलेल्या निवडणुकीत प्रभारी अधिका-यांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा वादग्रस्त निर्णय कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी घेतला. या निर्णयावर उत्क र्ष पॅनलतर्फे आक्षेप घेतला असून, विद्यापीठ कायद्याची पायमल्ली झाल्याचा आरोप केला जात आहे.विद्यापीठ प्रशासनाने व्यवस्थापन परिषदेसाठी ड्रॉ पद्धतीने शुक्रवारी (दि.२५) आरक्षण जाहीर केले. याच दिवशी निवडणुकीची अधिसूचना रात्री उशिरा काढली. या निवडणुकीत मतदानासाठी पात्र सदस्यांची यादीही जाहीर केली. या यादीत प्रभारी असलेल्या कुलसचिव, परीक्षा व मूल्यमापन संचालक, वित्त व लेखाधिकारी, चार अधिष्ठाता, क्रीडा संचालक, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक, आजीवन विस्तार संचालक, उपकेंद्र संचालक, या सर्वांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची नियुक्तीही तात्पुरत्या स्वरुपात असून, त्यांना कोणत्याही धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी होता येत नाही. याठिकाणी तर अधिसभेच्या बैठकीत हजारो मते घेऊन निवडून आलेल्या सदस्यांच्या बरोबरीने प्रभारींना मतदानाचा अधिकार देण्यात आला. यावर उत्कर्ष पॅनलतर्फे आक्षेप नोंदविला आहे. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीत विद्यापीठ कायदा कलम ३० (४)(च, छ, ज, झ) नुसार पत्र काढून प्रभारी अधिकाºयांना मतदान करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र विद्यापीठात या सर्व कायद्यालाच हारताळ फासला असल्याचा आरोप अधिसभा सदस्य प्रा. सुनील मगरे, डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी केला. प्रभारी अधिकाºयांची घुसडलेली नावे तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदनही निवडणूक निर्णय अधिकाºयांना उत्कर्ष पॅनलतर्फे डॉ. भारत खैरनार, डॉ. विलास खंदारे, प्रा. सुनील मगरे यांनी दिले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक