शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात भरड धान्य खरेदीत बारदान्याचा अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:38 IST

चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमध्ये ज्यूट मिल्स बंद असल्याने निर्माण झाला पेच

ठळक मुद्देकापूस खरेदीचेही त्रांगडेच 

- स. सो. खंडाळकर 

औरंगाबाद : मुदत संपायला आली तरी भरडधान्य खरेदीचा मार्ग सुकर होताना दिसत नाही. ३० जून ही भरडधान्य खरेदीची शासनाने दिलेली शेवटची तारीख आहे. बारदाना नसल्याने भरडधान्य खरेदीत अडचण निर्माण झाली आहे. एक तर ही केंद्रेच उशिरा सुरू झाली आणि झाली तरी ती बारदाना नाही म्हणून बंद अवस्थेतच राहिली. याचे जवळचे उदाहरण म्हणजे करमाडचे खरेदी केंद्र.

पश्चिम बंगालला नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाचा फटकाही भरडधान्य खरेदीला बसला. भरडधान्य खरेदीकरिता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्यूट आयुक्त, मुंबईमार्फत नवीन बारदान्याची मागणी केली होती;  परंतु बारदान्याचा पुरवठा होऊ शकला नाही. एक तर लाकडाऊन आणि त्यात पश्चिम बंगालला बसलेला चक्रीवादळाचा तडाखा. चक्रीवादळामुळे बंगालमधील ज्यूट मिल्स बंद आहेत. त्यामुळे तिकडून बारदाना मागवूनही मिळाला नाही आणि नजीकच्या काळातही मिळण्याची शक्यता नाही. मार्केटिंग फेडरेशनने काढलेल्या ई निविदेसही योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळेही बारदाना उपलब्ध होऊ शकला नाही. मार्केटिंग फेडरेशनने दिलेल्या प्रस्तावानुसार शासनाने आता शेतकऱ्यांकडील बारदान्यामध्ये मका व ज्वारी खरेदी करण्याची  परवानगी दिली आहे. केंद्र शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना बारदान्याची  किंमत अदा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्शर्भूमीवर शासनाने प्रथमच रबी हंगामाकरिता भरड धान्य खरेदीचा निर्णय घेतला होता. मुदत संपायच्या आत ही खरेदी होते का, शासनाने परवानगी दिली तरी शेतकरी बारदान्याच्या बाबतीत कसा प्रतिसाद देतात, हे आता पाहावयाचे.

कापूस खरेदीचेही त्रांगडेच राज्यभरातील कापूस उत्पादकांचा कापूस शासन कधी खरेदी करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासन कापसाला साडेपाच हजार रुपये इतका हमीभाव देत आहे. खुल्या बाजारात इतका भाव नाही. त्यामुळे यात व्यापारी हात धुऊन घेण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणी पथके नियुक्त केली. थेट कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटून त्यांचा किती कापूस शिल्लक आहे, याचा  अहवाल मागवला होता. हे काम युद्धपातळीवर व्हायला हवे होते; परंतु तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांतील कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत. एक तर लाकडाऊनमुळे कापूस खरेदीला विलंब झाला. त्यामुळे हा कापूस खरेदीविना शेतकऱ्यांकडे पडून आहे. त्यातच हे प्रकरण औरंगाबाद खंडपीठात गेले आहे. दरम्यान, यंदा पावसानेही उत्तम सुरुवात केली असल्याने आनंदाचे वातावरण पसरले आहे. मात्र, कापूस खरेदी रखडली असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAurangabadऔरंगाबाद