शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

'ओ शेठ, तुम्ही महागाई, बेरोजगारी वाढवली थेट'; विद्यापीठात विद्यार्थ्यांचे लक्षवेधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 16:19 IST

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university News : विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत लक्ष वेधून घेतले.

ठळक मुद्देसर्वसामान्य जनता आणि युवकांना दिलासा द्यावा.स्पर्धा परीक्षा वेळेवर घेण्यात याव्यातअनेक वर्षांपासून बंद असलेली प्राध्यापक भरती सुरु करावी

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षा वेळेवर घ्याव्या, इंधन दर कमी करून महागाई पासून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आज दुपारी १२ वाजेच्या दरम्यान निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 

विद्यापीठ गेटसमोर सत्यशोधक विद्यार्थी संघटना, ‘एसएफआय’, सम्यक विद्यार्थी आंदोलन, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, एनएसयूआय, ऑल इंडिया पँथर सेना व समता कला मंच या संघटनांनी संयुक्तपणे हे आंदोलन केले. देशात पेट्रोल, डिझेल पाठोपाठ, गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. यामुळे महागाई वाढून सर्वसामान्य जनता अतिशय हलाखीत जीवन कंठीत आहे. दुसरीकडे, अनेक वर्षांपासून नोकरभारती बंद असल्याने युवकांमध्ये नैराश्येची भावना पसरली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने सर्वसामान्य जनता आणि युवकांना दिलासा द्यावा. स्पर्धा परीक्षा वेळेवर घेण्यात याव्यात, अनेक वर्षांपासून बंद असलेली प्राध्यापक भरती सुरु करावी, विविध विभागांतील रिक्त पदे तत्काळ भरावीत, इंधनदर वाढ मागे घ्यावी, आदी मागण्यांचे निवेदन विद्यार्थ्यांनी विभागीय आयुक्तांना सादर केले आहे.

या आंदोलनात लोकेश कांबळे, अमोल खरात, प्रकाश इंगळे, निलेश आंबेवाडीकर, निशिकांत कांबळे, दिपक पगारे, सुरेश सानप, अविनाश सिताफळे, स्वाती चेके, निषा नरवडे, किरण बनसोडे, सत्यजीत म्हस्के, नितीन वाहूळ, राहूल खंदारे, जयश्री शिर्के, अक्षदा शिर्के, अनिल दीपके, अमोल घुगे, भीमराव वाघमारे, अमोल दांडगे, अमित कुटे, सचिन बोराडे, दादाराव कांबळे, दीक्षा पवार, पांडूरंग भूतकर, योगेश बहादूरे, राहुल मकासरे, केशव नामेकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पोस्टर आणि घोषणांनी लक्ष वेधलेविद्यापीठ प्रवेशद्वारावर झालेल्या या निदर्शनात विद्यार्थ्यांनी  केंद्र आणि राज्य सरकारला जाब विचारणारे पोस्टर आणले होते. तसेच विद्यार्थ्यांनी सध्या व्हायरल असलेल्या 'ओ शेठ...' या गाण्यावर 'ओ शेठ, तुम्ही महागाई, बेरोजगारी वाढवली थेट' ही घोषणा लक्षवेधी ठरली. 'केद्र सरकार इंधन दरवाढ मागे घ्या', 'युवकांना रोजगार द्या' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.  

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन