शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यांत संपामुळे पोषण आहाराचा बोजवारा; हजारो कुपोषित बालकांच्या प्रकृतीचे काय?

By विजय सरवदे | Updated: December 20, 2023 11:20 IST

सुमारे साडेसहा हजार कुपोषित बालकांच्या प्रकृतीवर देखरेख कोणाची? हे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत.

छत्रपती संभाजीनगर : अंगणवाडी कर्मचारी संपावर असल्यामुळे मागील तेरा दिवसांपासून गरोदर माता, स्तनदा माता, किशोरी मुली, बालकांचे लसीकरण तसेच पोषण आहार वाटपाचा बोजवारा उडाला आहे. दुसरीकडे बचत गटांच्या माध्यमातून पोषण आहार वितरित केल्याचा दावा केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र किती बालकांपर्यंत पोषण आहार पोहोचतो? सुमारे साडेसहा हजार कुपोषित बालकांच्या प्रकृतीवर देखरेख कोणाची? हे सारेच प्रश्न अनुत्तरित आहेत.

जिल्ह्यात तीन हजारांच्या जवळपास अंगणवाड्या असून, तिथे अडीच हजार अंगणवाडी सेविका, ७७५ मिनी अंगणवाडी सेविका आणि अडीच हजार मदतनीस कार्यरत आहेत. या साऱ्याजणी आपल्या विविध मागण्यांसाठी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. आज १६ डिसेंबर रोजी संपाचा १३ वा दिवस आहे. तेव्हापासून अंगणवाड्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत.जिल्ह्यात शून्य ते ६ वर्षे या वयोगटातील सुमारे अडीच लाख बालके आहेत. यापैकी ६ हजार ६५० बालके कुपोषित आढळली आहेत. त्यांना संदर्भित आरोग्य सेवा, त्यांच्या प्रकृतीत होणारी सुधारणा यासाठी नियमित वजन, उंची व अन्य बाबींच्या नोंदी घेणे, इतर बालकांना नियमित पोषण आहाराचा पुरवठा करणे, त्यांचे लसीकरण, शालेय पूर्व शिक्षण, गर्भवतींची तपासणी, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम आदी कार्यक्रम थांबले असून, पोषण ट्रॅकवर त्यांच्या नोंदीची प्रक्रिया ठप्प आहे.

आयुक्तांनी चिंता व्यक्त केलीअंगणवाडी कर्मचारी संपावर गेल्यामुळे बालक, गरोदर माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित असून, ही बाब चिंतेची आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, वर्षातील ३०० दिवस पोषण आहाराचा पुरवठा करणे बंधनकारक आहे. त्यासंदर्भात जि. प. महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी पर्यायी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, संपावर असलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ‘नो वर्क नो पेमेंट’ या तत्त्वानुसार मानधन अदा न करण्याचेही सूचित केले आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद