शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

अस्वच्छता,साथीचे आजार वाढले...!

By admin | Updated: July 24, 2014 00:38 IST

वाळूज महानगर : बजाजनगरात अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढले असून, खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे.

वाळूज महानगर : बजाजनगरात अस्वच्छतेमुळे साथीचे आजार वाढले असून, खाजगी रुग्णालयात रुग्णांची संख्या वाढत आहे. याविषयी जि.प.सदस्य अनिल चोरडिया यांनी आरोग्य विभाग व एमआयडीसीकडे तक्रारी केल्यामुळे आज या दोन्ही विभागांच्या पथकाने भेट दिली.बजाजनगर कामगार वसाहतीतील स्वच्छतेकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष असल्यामुळे अस्वच्छता पसरली आहे. ड्रेनेज लाईनचे काम रखडल्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे. विविध सेक्टर्समधील ड्रेनेज लाईनचे सेफ्टी टँक चोकअप होत असल्यामुळे पाणी उघड्यावर साचते. कचरा व नाल्यांची नियमितपणे सफाई होत नाही. गेल्या १५ दिवसांपासून परिसरात साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. ताप येणे, मळमळ होणे, थंडी वाजणे, अंग व सांधे दुखणे आदींचा त्रास त्यांना होत आहे. याविषयी ‘लोकमत’ ने सविस्तर वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभाग व एमआयडीसीचे पितळ उघडे पाडले होते. त्यानंतर अनिल चोरडिया व युवा सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा दिला होता.आरोग्य विभागाने घेतला आढावाआरोग्य विभागाकडून पाहणीबजाजनगरात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आल्यामुळे आज आरोग्य विभागाच्या वतीने डॉ. बाविस्कर, डॉ. जयश्री लहाने, डॉ. बोराडे, तर एमआयडीसीचे उपअभियंता दिलीप परळीकर, जि.प. सदस्य अनिल चोरडिया यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन पाहणी केली. एमआयडीसीने त्वरित स्वच्छता मोहीम हाती घेतली. नाल्यांची साफसफाई करून औषध फवारणी सुरूकेली. आरोग्य विभाग रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांना उपचाराचे मार्गदर्शन करीत आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश पाटील, अंकुश पुंड, युवा सेनेचे तालुकाधिकारी अमित चोरडिया, रवींद्र राठोड, सुमित गुरव, अजय राठोड आदी उपस्थित होते.