लातूर : नूतन पोलिस अधीक्षक म्हणून डॉ. एस. टी. राठोड यांनी सोमवारी आपल्या पदाचा पदभार स्विकारला. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. आयोजित छोटेखानी कार्यक्रमात डॉ. चव्हाण यांनाही पोलिस कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला.राज्याच्या गृहविभागाने पोलिस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या केल्या असून, लातूरचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची बदली मुंबई येथे करण्यात आली आहे. मुंबई येथील प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य असलेले डॉ. एस. टी. राठोड यांची लातूरच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सोमवारी सकाळी जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात डॉ. एस. टी. राठोड यांच्याकडे पोलिस अधीक्षक पदाचा पदभार सोपविला. (प्रतिनिधी)
नूतन पोलीस अधीक्षक राठोड यांनी घेतला पदभार
By admin | Updated: May 16, 2016 23:44 IST