कंधार : तालुक्यातील ६० अंगणवाड्या आयएसओ करण्याचा संकल्प करण्यात आला आहे़ परंतु कुपोषण वाढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे़ तीव्र कुपोषित बालकांची संख्या जून महिन्यात ३०६ असल्याचे उघड झाले आहे़ तालुका कुपोषणमुक्त करण्याचे स्वप्न मात्र मृगजळ ठरत असल्याची बाब आकडेवारीवरून दिसत असल्याचे चित्र आहे़तालुक्यात अंगणवाड्यांची संख्या ३२० आहे़ त्यात मोठ्या २४१ व मिनी अंगणवाड्या ७९ आहेत़ कुपोषणमुक्तीसाठी नोव्हेंबर २०१३ मध्ये विशेष अभियान राबविण्यात आले़ त्यामुळे तालुक्यात कुपोषित बालके राहणार नाहीत, अशी परिस्थिती-वातावरण निर्मितीमुळे वाटले़ अल्पसे प्रमाण कमी झाले़ त्यामुळे आनंद द्विगुणित झाला, परंतु हा आनंद चिरकाल टिकला नाही़ नोव्हेंबर २०१३ मध्ये ० ते ६ वयोगटातील बालकांची संख्या २३ हजार ५४९ होती़ सर्वसाधारण बालके २० हजार ७२४ होती़ कमी वजनाचे १६२१ बालके होती़ तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३१४ होती़ विशेष अभियानाने संख्या घटली़ परंतु आता त्यात वाढ झाल्याचे समोर आले आहे़ अंगणवाडी मदतनीस पदे चिखलभोसी- २, कुरुळा- १ व सावरगाव (नि)-२ अशी ५ पदे रिक्त आहेत़ त्यातच पर्यवेक्षिकेची ३ पदे रिक्त आहेत़ पानभोसी, दिग्रस व रूईचा त्यात समावेश आहे़ त्यामुळे या विभागाचा पदभार अन्यकडे सोपविण्यात आला आहे़ त्यातच आपल्या विभागाचा कार्यभार पेलताना अन्य विभागाचा अतिरिक्त पदभार पार पाडताना कुपोषणमुक्ती करण्यापेक्षा त्यात वाढच होणार आहे़ दिग्रसमध्ये कुपोषित बालकसंख्या ११ ने वाढली़ मार्चमध्ये दिग्रस विभाग सर्वात कमी कुपोषित बालके असलेला होता़ (वार्ताहर)तालुक्यात अंगणवाडीतील कार्य पाहण्यासाठी १० विभाग करण्यात आले आहेत़ त्या-त्या विभागात विशिष्ट संख्येने अंगणवाड्यांचा समावेश करण्यात आला आहे़ त्या विभागातील कुपोषणाची स्थिती अशी -विभाग मार्च २०१४ जून २०१४वाढ संख्याकुपोषित संख्या कुपोषित संख्या१़ कुरूळा १६१७१२़ दिग्रस ८१९११३़ पानशेवडी ३१ ३२१४़ शेकापूर १५ २४९५़ पानभोसी २६३०४६़ रूई १६२२६७़ पेठवडज ३१४४१३८़ बारूळ २४२६२९़ चिखली ३३३३--१०़ उस्माननगर ५६५९३एकूण २५६ ३०६ ५०मार्च १४ जून १४० ते ६ २३,७५७ २३,१०६वय बालकेसर्वसाधारण २१,२३५ २१,१३६बालकेकमी वजनाचे ११६४ १३३३तीव्र कुपोषित २५६ ३०६
कंधारात तीव्र कुपोषित बालकांची संख्या ३०६
By admin | Updated: July 29, 2014 01:10 IST