शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आता भगवान गडावरील दसरा मेळाव्यावरून वादाची ठिणगी; कृती समिती उतरली मैदानात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 15:40 IST

कृती समितीने मेळावा आयोजनाची तयारी सुरु केल्याने भगवान गड आणि  पंकजा मुंडे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. 

औरंगाबाद: मुंबईत शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या कोणत्या गटाचा दसरा मेळावा हा वाद न्यायालयात निकाली निघाला नाही तोच आता भगवान गडाच्या पायथ्याशी खंडित मेळावा पुन्हा सुरु करण्याचे कृती समितीने जाहीर केल्याने नव्या वादाची ठिणगी पडली आहे. भगवान गडावरील दसरा मेळाव्याची परंपरा गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूने खंडित झाली आहे. तीच पक्षविरहित मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरु करणार असल्याचे या कृती समितीने स्पष्ट केले आहे. 

भगवान गडावर संत भगवान बाबा यांनी दसरा मेळावा सुरु केला. हिच परंपरा स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पुढे ठेवली. येथील मेळाव्यास राजकीय अंग नसेल ही एकमेव अट होती. गोपीनाथ मुंडे यांच्या हयातीत दरवर्षी या ठिकाणी उत्स्फूर्त मेळावे होत. मात्र, त्यांच्या मृत्युनंतर काही मतभेद झाल्याने गडावरील मेळाव्याची परंपरा खंडित झाली. दरम्यान, माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान बाबा यांच्या मुळगावी सावरगाव येथे मेळावा घेण्यात सुरुवात केली आहे. सर्वकाही सुरळीत सुरु आहे असे वाटत असतानाच काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी भगवान गडावर मेळावा घेणार असल्याचे जाहीर केले. तर आता भगवान गडावर दसरा मेळावा घेण्यासाठी एक कृती समिती मैदानात उतरली आहे. यामुळे भगवान गड आणि पंकजा मुंडे पुन्हा एकदा केंद्रस्थानी आले आहेत. 

खंडित मेळावा पुन्हा सुरु करणार कृती समिती कोणालाच आव्हान देत नाही. आम्ही केवळ गडावरील मेळाव्याची परंपरा पुन्हा सुरु करत आहोत. हा मेळावा पक्षविरहित असून कृती समितीत सर्वजन आपले पक्ष बाजूला ठेऊन आले आहेत. दसऱ्याला होणाऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे- धनंजय मुंडे यांनी यावे, असे आवाहनही कृती समितीने केले आहे. तसेच महंत नामदेव शास्त्री यांचा गडाच्या पायथ्याशी मेळावा घेण्यास विरोध नसेल. आम्ही त्यांच्याशी संपर्क करू, असेही कृती समितीने स्पष्ट केले आहे. 

अशी आहे कृती समितीबाळासाहेब सानप ( औरंगाबाद, विनोद वाघ ( बुलढाणा), दादासाहेब मुंडे ( बीड), बाळासाहेब वाघ ( नाशिक ), देविदास खेडकर ( अहमदनगर), शिवराज बांगर ( बीड), रवींद्र नागरगोजे ( उस्मानाबाद ), राणाप्रताप पालवे ( अहमदनगर), अशोक लाडवंजारी ( जळगाव ), ईश्वर बुधवंत ( पुणे), विलास आघाव ( हिंगोली ), रमेश सानप ( अहमदनगर ) , सुभाष जावळे (पुणे), दिलीप घुगे ( हिंगोली ), सुग्रीव मुंडे ( बीड), बाबासाहेब ढाकणे ( पुणे ), गजानन ढाकणे ( जालना), विनोद सानप ( यवतमाळ ), सह्चीन इप्पर ( वाशीम), अनिल गरकर ( वाशीम) , वैभव घुगे ( अकोला) 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड