शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

शाईच्या बाटल्या इतिहासजमा; आता म्हैसूर पेंट्सच्या 'मार्कर पेन'ने उमटणार मतदानाची निशाणी!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 10, 2026 19:47 IST

तुमच्या बोटावरच्या अभिमानाची रेघ आता 'मार्कर'ने उमटणार.

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीत मतदान केंद्रावर गेल्यावर तुम्हाला एक वेगळा बदल पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत बाटलीतील शाईत काडी बुडवून बोटावर लावली जाणारी पारंपरिक पद्धत आता इतिहासजमा झाली असून, त्याऐवजी आधुनिक 'मार्कर पेन'चा वापर केला जाणार आहे.

शहरात ६ हजार मार्कर पेन दाखलनिवडणूक आयोगाने या प्रक्रियेसाठी शहरात ६ हजार विशेष मार्कर पेन उपलब्ध करून दिले आहेत. म्हैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमिटेडकडून तयार करण्यात आलेले हे पेन दोन दिवसांत सर्व निवडणूक केंद्रप्रमुखांना वितरित केले जातील.

शाई 'पक्की' असण्याचे विज्ञानमार्करपेनच्या शाईमध्ये 'सिल्व्हर नायट्रेट' हा मुख्य घटक आहे. जेव्हा या पेनने बोटावर रेघ ओढली जाते, तेव्हा त्वचेतील प्रथिनांशी त्याची रासायनिक अभिक्रिया होऊन 'सिल्व्हर क्लोराईड' तयार होते. परिणामी, ही शाई पाण्याने कितीही धुतली तरी निघत नाही.

आयोगाने हा बदल का केला?१. स्वच्छता : शाई सांडून कपडे किंवा टेबल खराब होण्याचे कर्मचाऱ्यांचे टेन्शन मिटले.२. स्पष्टता : पेनामुळे बोटावर अधिक सुबक आणि स्पष्ट रेघ ओढणे सोपे झाले आहे.३. पारदर्शकता : ही शाई रसायनयुक्त असल्याने ती पुसून टाकणे अशक्य आहे, ज्यामुळे बोगस मतदानाला पूर्णपणे आळा बसेल.

शाई कोठे लावली जाणार?नियम : नियमानुसार, मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर (नखापासून त्वचेपर्यंत) उभी रेघ ओढली जाईल.अपवाद : जर डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या तर्जनीवर आणि दोन्ही हात नसतील तर पायाच्या बोटावर किंवा एखाद्याला पायसुद्धा नसतील तर खांद्यावर शाई लावली जाईल.

नगर परिषदेनंतर महानगरपालिका निवडणुकीत मार्कर पेनचा वापरनिवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये नगर परिषद निवडणुकीत मार्कर पेनचा वापर करण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाला. यामुळे आता महानगरपालिका निवडणुकीत मार्कर पेनने मतदारांच्या बोटावर रेघ मारण्यात येईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Election Innovation: Mysore Paints Marker to Mark Voters Now

Web Summary : Elections will now use marker pens from Mysore Paints instead of ink. These pens use silver nitrate which creates a permanent mark. This change improves cleanliness, clarity, and prevents fraudulent voting, enhancing election integrity.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६