शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

आता मिशन अ‍ॅडमिशन

By admin | Updated: June 13, 2014 00:34 IST

लातूर : जून महिन्यातील पहिला आठवडा संपला आहे. सीबीएसई पॅटर्नच्या दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत.

लातूर : जून महिन्यातील पहिला आठवडा संपला आहे. सीबीएसई पॅटर्नच्या दहावी व बारावीचे निकाल लागले आहेत. बारावीचाही निकाल नुकताच लागला आहे. आता दहावी बोर्डाचा निकाल १७ जून रोजी जाहीर होणार आहे. उर्वरित पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे निकाल एक-दोन आठवड्यांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी व पालकांची अकरावीच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. निकालानंतर सर्वांचेच ध्येय ‘मिशन अ‍ॅडमिशन’चे आहे. त्यामुळे जिल्ह्यात ११ वीच्या नेमक्या जागा किती, अन्य अभ्यासक्रमाच्या संदर्भात किती आदी संदर्भातील आकडेवारी.दहावी व बारावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश लातूर जिल्ह्यातील पोरांनी मिळविले. वैद्यकीय व अभियांत्रिकीच्या प्रवेशपूर्व परीक्षेतही लातूरच्या विद्यार्थ्यांचा दबदबा वाढतच आहे. त्यामुळे पुण्या-मुंबईकडील विद्यार्थ्यांचा ओढा लातूर शहरात वाढला आहे. परिणामी, अकरावीच्या प्रवेशासाठी स्थानिकांसह बाहेर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कसरत करावी लागते. नुकत्याच जाहीर झालेल्या वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेत राजर्षी शाहू महाविद्यालयातील विविध प्रवर्गातील पहिले पाच विद्यार्थी राज्यात पहिले आले आहेत. दयानंद महाविद्यालयाच्याही विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षेत चांगले यश मिळविले आहे. त्यामुळे बाहेरच्या विद्यार्थ्यांना लातूरचे आकर्षण वाढले आहे. अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयानेही सीईटी परीक्षेतील यशाची परंपरा कायम ठेवल्याने तिकडेही विद्यार्थ्यांचा ओढा आहे.लातूर शहरातील राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विज्ञान महाविद्यालय आणि अहमदपुरातील महात्मा गांधी महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश मिळविण्यासाठी दरवर्षीच चढाओढ होते. आता दहावीचा निकाल १७ जूनला लागणार असल्याने या तिन्ही महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयांनी क्षमतेनुसार प्रवेश देण्याची तयारी केली आहे. या तिन्ही नामांकित महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयेही आता स्पर्धेत आली आहेत. नुकत्याच लागलेल्या सीईटीच्या परीक्षेत ते दिसून आले आहे. त्यामुळे या महाविद्यालयांसह अन्य महाविद्यालयांतही चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाची सोय झाली आहे. (प्रतिनिधी)पदव्युत्तर आणि संशोधनातही लातूर...अकरावी, बारावी आणि सीईटीपुरते मर्यादित शिक्षण लातुरात आहे. पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनात जिल्हा मागे आहे, असा काहींचा समज आहे. परंतु, ‘शाहू’, ‘दयानंद’, ‘बसवेश्वर’, ‘सुशिलादेवी’ विद्यापीठ उपकेंद्रांतील विद्यार्थ्यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण आणि संशोधनात आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेशही हाऊसफुल्ल होत आहे.