शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आता कनिष्ठ महाविद्यालयांची होणार तपासणी; सुविधा,विद्यार्थी उपस्थिती,शिक्षकांची पडताळणी

By योगेश पायघन | Updated: July 28, 2022 20:16 IST

विद्यापीठाच्या धर्तीवर पडताळणीसाठी जिल्हास्तरीय पथकांची नेमणूक करण्यात आली आहे 

- योगेश पायघनऔरंगाबाद- विद्यापीठाने भौतिक सुविधा, अध्यापक नसलेल्या ६ महाविद्यालये ‘नो ॲडमिशन झोन’मध्ये टाकून दंडात्मक कारवाई केली. त्याच धर्तीवर अकरावी-बारावीच्या कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हानिहाय पथक नेमण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.

जिल्ह्यात अकरावी प्रवेश क्षमता निश्चितीत २२ हजार जागा घटवण्यात आल्या. आता भौतिक सुविधांसह, अध्यापकांची नेमणूक तपासणीसाठी जिल्हानिहाय पथकांची स्थापना विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय करते आहे. केवळ प्रवेश आणि परीक्षा यातून दुकानदारी करणाऱ्या महाविद्यालयांची निवड करून अचानक ही तपासणी होणार आहे. त्यावेळी कनिष्ठ महाविद्यालयात मंजूर विषयासाठी आर्हता प्राप्त शिक्षकाची नेमणूक, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि भौतिक सुविधांची पडताळणी पथक करणार आहे. विभागात असलेल्या औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ही पडताळणी होणार असल्याचे शिक्षण उपनिरीक्षक डाॅ. सतीश सातव म्हणाले.

क्षमता निश्चितीनंतर गुणवत्तेवर लक्षअकरावी-बारावी प्रवेशाची क्षमता निश्चिती झाल्यावर आता शिक्षण विभागाने गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले आहे. गुणवत्ता कक्षाच्या सूचना, शिक्षण विभागाने दिलेले कार्यक्रम आणि शासन निकषांची पूर्तता करणे कनिष्ठ महाविद्यालयांना बंधनकारक असून, पहिल्यांदा अशा पद्धतीची तपासणी विभागात होत आहे.

पडताळणी केली जाईल मंडळाची मान्यता घेतलेल्या विषयांना महाविद्यालयांनी शिक्षक नेमले पाहिजे. तसेच अकरावी-बारावी प्रवेशित आणि पटावरील विद्यार्थ्यांची उपस्थिती, भौतिक सुविधांची पडताळणी जिल्हास्तरीय पथके करतील. त्यासंदर्भात त्या महाविद्यालयांना भेटीपूर्वी सूचना देऊ.- अनिल साबळे, विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षण