शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आता पदवीला ‘भारतीय संविधान’ अनिवार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 19:58 IST

येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

ठळक मुद्दे विद्यापरिषदेच्या बैठकीत ठरावाला मान्यता

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘भारतीय संविधान’ हा विषय अनिवार्य असणार आहे. याविषयीच्या ठरावाला विद्यापरिषदेच्या मंगळवारी (दि.३१) झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.

विद्यापीठाच्या विद्यापरिषदेची बैठक कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा फुले सभागृहात झाली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ. साधना पांडे यांची उपस्थिती होती. या बैठकीला परिषदेचे ४० सदस्य उपस्थित होते. त्यात एकूण ५० प्रस्ताव मांडण्यात आले. २ डिसेंबर रोजी झालेल्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत सर्व संलग्नित महाविद्यालयातील पदवी अभ्यासक्रमाला ‘भारतीय संविधान’ हा विषय अनिवार्य करण्याचा प्रस्ताव अधिष्ठाता डॉ. सतीश दांडगे यांनी मांडला होता. त्यास मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव विद्यापरिषदेच्या विचारार्थ मंगळवारी ठेवण्यात आला.

यावर बोलताना कुलगुरू डॉ. येवले म्हणाले की, जगातील सर्वात मोठी लिखित घटना म्हणून आपल्या देशाची ओळख आहे. त्या भारतीय संविधानाचा प्रत्येकाने तरुण वयातच अभ्यास करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन पदवी स्तरावर ‘भारतीय संविधान’ हा विषय अनिवार्य करण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. त्यास सर्व सदस्यांनी बहुमताने पाठिंबा दर्शविला. यानुसार पदवी अभ्यासक्रमाला प्रथम वर्षाला ‘पर्यावरण’, द्वितीय वर्षी ‘संगणकशास्त्र’ आणि तृतीय वर्षातील पाचव्या सत्रात ‘भारतीय संविधान’ हा विषय अनिवार्य असणार आहे, असेही कुलगुरू डॉ. येवले यांनी स्पष्ट केले.

संशोधनाच्या दर्जात तडजोड होणार नाहीउच्चशिक्षणातील संशोधन आणि परीक्षा पद्धतीमध्ये गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड केली जाणार नाही. विद्यापीठाच्या तिजोरीवरील अतिरिक्त बोजा कमी करण्यासाठी आर्थिक शिस्त लावण्यात येईल. पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांची संख्या भरमसाठ वाढली आहे.४ज्या महाविद्यालयांमध्ये मान्यताप्राप्त शिक्षक, भौतिक, पायाभूत सुविधांचा अभाव आहे त्यांच्यासाठी राज्य शासन, यूजीसीच्या नियमांची कडकपणे अंमलबजावणी केरील, असेही कुलगुरू डॉ. येवले यांनी स्पष्ट केले. तसेच स्वयंनिर्वाही अभ्यासक्रम चालविणारे विविध विभाग, क्लबचे एकत्रीकरणे केले जाईल.  नाट्यशास्त्र, संगीत, नृत्यशास्त्र विभाग एक करण्यात येईल. उपयोजित गणित यासह विद्यार्थी संख्येचा प्रश्न असलेले विभाग बंद केले जातील, असेही कुलगुरू  डॉ. येवले म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयAurangabadऔरंगाबाद