शहरं
Join us  
Trending Stories
1
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
2
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
3
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
4
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
5
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
6
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
7
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
8
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
9
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
10
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
11
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
12
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
13
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
14
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
15
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
16
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
17
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
18
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद
19
'हा' मराठमोळा स्टार टीव्ही इंडस्ट्रीत सर्वांत महागडा! दिलीप जोशी, रुपाली गांगुलीही मागे पडले!
20
जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

आता खते, बियाणांचा दुष्काळ

By admin | Updated: April 28, 2016 23:51 IST

सुनील कच्छवे, औरंगाबाद दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपात खते आणि बियाणांच्या टंचाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

सुनील कच्छवे, औरंगाबाददुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपात खते आणि बियाणांच्या टंचाईलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. विभागात शासनाने खताचा मागणीपेक्षा ४ लाख मेट्रिक टनांनी कमी साठा मंजूर केला आहे. त्याशिवाय सोयाबीनच्या बियाणाचाही तब्बल सव्वालाख क्विंटलचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात चार वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. यंदाही कमी पावसामुळे खरिपाची बहुतांशी पिके हातची गेली. अनेक भागात रबीचा पेराही झाला नाही. त्यामुळे विभागातील शेतकरी पूर्णपणे नागवला गेला. या परिस्थितीत आता शेतकऱ्याला यंदाच्या खरिपात बियाणे आणि खतांच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने विभागासाठी खतांचा कमी साठा मंजूर केला आहे. कृषी विभागाने मराठवाड्यासाठी एकूण १४ लाख ७४ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली होती. प्रत्यक्षात १० लाख २९ हजार मेट्रिक टन खताचा साठा मंजूर झाला आहे. त्यापैकी आतापर्यंत ६५ हजार मेट्रिक टन खतांचा साठा दाखल झाला आहे. मराठवाड्यात सरासरी ५४ लाख हेक्टर पेरणी क्षेत्र आहे. त्यापैकी सुमारे १६ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होणे अपेक्षित आहे. तर सोयाबीनचे क्षेत्र १० लाख २९ हजार हेक्टरपर्यंत राहण्याची शक्यता आहे. दोन्ही पिकांचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. त्यामुळे खतांची मागणीही वाढते आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने १४ लाख ७४ हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविली आहे. मात्र, शासनाने १० लाख २९ हजार मेट्रिक टन इतका साठा मंजूर केला आहे. परिणामी विभागात खतांचा विशेषत: युरिया आणि संयुक्त खतांचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. खतांप्रमाणेच सोयाबीनच्या बियाणांचीही उपलब्धता गरजेपेक्षा कमी असणार आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्यात सोयाबीनच्या पेरणीसाठी एकूण ६ लाख १७ हजार क्विंटल एवढ्या बियाणांची गरज आहे. शेतकरी, खाजगी कंपन्या, महाबीज कंपनी आदींकडील बियाणांची उपलब्धता केवळ ४ लाख ९७ हजार क्विंटल एवढी आहे. त्यामुळे विभागात १ लाख २० क्विंटल बियाणांचा तुटवडा भासू शकतो. मराठवाड्यात गेल्या वर्षी खताला कमी उठाव होता. त्यामुळे काही ठिकाणी खत शिल्लक आहे. सोयाबीनचा फारसा तुटवडा भासेल असे दिसत नाही. तरीही कृषी विभाग सर्वतोपरी काळजी घेत आहे. शेतकऱ्यांना खते-बियाणे वेळेत मिळतील यासाठी प्रयत्न केले जात आहेत.- पंडित लोणारे, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी