औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती फुटल्याने आणि आघाडी तुटल्याने मर्जीतील नगरसेवक, शाखाप्रमुख, वॉर्ड अध्यक्ष, ब्लॉक अध्यक्षांची पळवापळवी सुरू झाली आहे. काही मतदारसंघांमध्ये सेना-भाजपाचे कार्यकर्ते घटस्फोट होण्यापूर्वी गळ्यात गळे घालून काम करीत होते. आता तेच कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. शिवसेनेच्या शाखाप्रमुखांमध्ये दोन गट पडले आहेत. मध्य मतदारसंघात ती परिस्थिती निर्माण झाली आहे. तर राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही अडचणीत सापडले आहेत. पश्चिम मतदारसंघामध्ये भाजपाने आयात उमेदवार दिला आहे. त्यामुळे भाजपाचे मूळ पदाधिकारी प्रचारातून गायब झाले आहेत. शिवसेनेमध्ये काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. हर्सूल परिसरातील एका नगरसेवकाच्या कार्यालयावरून सेना-भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. हर्सूल हा वॉर्ड मध्य मतदारसंघात आहे. त्या वॉर्डात भाजपाने कब्जा करण्यास सुरुवात करताच सेनेनेही कार्यालय मिळविण्यास सुरुवात केली आहे.
आता नगरसेवक, कार्यकर्त्यांची पळवापळवी
By admin | Updated: October 1, 2014 00:50 IST