शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आता देवही जाती-जातीत वाटण्याचा धंदा सुरू झाला : नाना पटोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 23:06 IST

आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

औरंगाबाद : आतापर्यंत भाजपची मंडळी माणसा-माणसांमध्ये फूट पाडीत होती. आता ही मंडळी देवांनाही जाती-जातीत वाटायला लागली आहे, अशी टीका काँग्रेसच्या किसान सेलचे राष्टÑीय अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.सकाळी ते सुभेदारी गेस्ट हाऊसवर पत्रकारांशी बोलत होते. ‘काय तर म्हणे हनुमान दलित आहे. का तर म्हणे तो रामाच्या पायाशी बसलेला आहे. पायाजवळची माणसे दलित. ही २१ व्या शतकातील यांची धारणा काय सांगून जाते? किती हा जातीयवाद आणि संकुचितता? असे सवाल यावेळी पटोले यांनी उपस्थित केले.नरेंद्र मोदी खासदारांनाही बोलू देत नाहीत. ‘नोकरी’ (पदे) टिकवण्यासाठी मोठ-मोठे नेतेही मोदींपुढे कशी जी हुजरेगिरी करतात, याचे अनेक किस्से पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, जीएसटीवरून माझे मोदींशी मतभेद झाले. भाजप खासदारांच्या बैठकीत मी माझे म्हणणे मांडले असताना मला मोदींनी सुनावले. ‘अब आप हमको सीखाऐंगे क्या? असा सवाल त्यांनी मला केला. मग त्या बैठकीत कुणालाच बोलू दिले गेले नाही.जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणे म्हणजे लोकशाही, असे मी मानतो. याचाच प्रचंड अभाव भाजपमध्ये आढळून आल्याने मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देऊन बाहेर पडलो, असे ते म्हणाले.सगळ्यात वाईट मुख्यमंत्री...देवेंद फडणवीस यांच्यावरही त्यांनी टीका केली. पटोले यांनी सांगितले की, महाराष्टÑात आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सगळ्यात वाईट मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस. या मंडळींनी महाराष्टÑाचे वाटोळे करून ठेवले आहे. सुधाकर नाईक यांनी सुरू केलेल्या जलसंवर्धन योजनेचे नाव बदलले आणि महाराष्टÑात पाणीच पाणी असे सांगत ते देशभर मार्केटिंग करीत फिरत आहेत. मग महाराष्टÑातील १५३ तालुक्यांमध्ये टँकर्स कसे चालू आहेत.मराठवाड्यातून १ हजार २५० उद्योग गेले. राज्यावरील कर्जाचा बोजा आघाडी सरकारच्या काळातल्यापेक्षा कितीतरी पटीने वाढला. दरवर्षी पाच लाख नोकऱ्या देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात केले होते. प्रत्यक्षात नोकºया तर दिल्या नाहीतच; पण त्या खाल्ल्या. आज राज्य सरकारी कर्मचाºयांची संख्या ४० टक्केच आहे. ६० टक्के कर्मचारी कमी आहेत. हे चांगल्या प्रशासनाचे लक्षण नाही, असे पटोलेंनी बजावले.यावेळी श्याम पांडे, राजेंद्र परसावत, हिशाम उस्मानी, सत्तार खान आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद