आकर्षक गार्डन
मंगलम वेडिंग डेस्टिनेशन ॲण्ड क्लब येथे लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा विचार करून तशा आधुनिक सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यातीलच एक म्हणजे येथील गार्डन सर्वसोयी सुविधांयुक्त निसर्गरम्य वातावरणातील गार्डन ‘दिलखेच’ ठरणार आहे. लहानथोरांना प्रत्येकाला या गार्डनमध्ये जाण्याचा मोह आवरता येणार नाही. असे आकर्षक व युनिक गार्डन बनविण्यात येणार आहे. गार्डनचे प्रवेशद्वारही तेवढेच आकर्षक असणार आहे. येथे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणी असणार आहे. ज्यात बच्चेकंपनी खेळण्यात हरखून जातील. गार्डनच्या मध्यभागी कारंजे नयनरम्य वातावरण बनवतील. पारंपरिक गुंबज येथील शान आणखी वाढवतील. येथे एक भाग वाळूचाही असणार आहे. नदीकाठी, समुद्राकाठीची वाळू तुम्हाला येथे बघण्यास मिळेल, एवढेच नव्हे तर त्या वाळूवर प्रत्यक्ष खेळण्याचा आनंद घेता येईल. घोडे, उंट, हत्तीवर बसून गार्डनची परिक्रमा करता येईल, अशी खास व्यवस्था येथे असणार आहे. येथील विविध प्रकारच्या वृक्षामुळे दिवसभर सावली व थंडगार वातावरण राहील. त्यात विविध शिल्पकलाही सर्वांचे लक्ष मोहित करेल. याठिकाणी कोणत्याही पॉइंटला सेल्फी काढता येईल, असेच संपूर्ण व्यवस्था असेल.
--
चौकट
ॲम्फीथिएटर स्टाइल वेडिंग
विवाहसोहळ्यातील सप्तपदी अन्य विधीसाठी खास येथे परिक्रमा : ॲम्फीथिएटर तयार करण्यात येणार आहे. रंगीबेरंगी पडद्यांचे छत असलेले ॲम्फीथिएटर बनविण्यात येईल. ज्याच्या चोहीबाजूने नातेवाईक, पाहुण्यांना बसण्यासाठी गोलाकार आसनव्यवस्था असेल. मध्यभागी यज्ञ असेल व वधू-वर सप्तपदी व अन्य विधी येथे करतील व तो क्षण सर्वजण आपल्या डोळ्यात कायमचे साठवून घेतील. कोणत्याही बाजूला बसले तरी विनाअडथळा विवाह विधी पाहता येईल. हे ॲम्फीथिएटर येथे कायमस्वरूपी असणार आहे.
--
चौकट
तंदुरुस्तीसाठी क्लब हाऊस
मंगलम वेडिंग डेस्टिनेशन डेस्टिनेशन क्लबमध्ये नुसते विवाह सोहळ्याचा विचार करण्यात आला नाही तर त्याचसोबत लोकांच्या तंदुरुस्तचाही विचार करण्यात आला आहे. साठीही खास ‘क्लब हाऊस’ तयार करण्यात येणार आहे. राजस्थानी वेडिंग लॉन व ॲम्फीथिएटरच्यामध्ये ‘क्लब हाऊस’ असणार आहे. येथे जिम असणार आहे. शिवाय बॅडमिंटनचा स्वतंत्र हॉल, स्क्वॅश कोर्ट, मीडिया रुमची सुविधाही देण्यात येणार आहे. तसेच येथील मुख्य आकर्षण ‘स्विमिंग पूल’ असणार आहे. याशिवाय इनडोअर गेम्सची व्यवस्था, योगा, प्राणायाम, ध्यानसाठी स्वतंत्र व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक आदी सुविधा असणार आहे. प्रदूषणमुक्त वातावरणातील क्लब हाऊस आरोग्य सुदृढ बनविण्यासाठी फायदेशीर ठरले.
----