शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

आता विद्यापीठात आंदोलनाला चाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:56 IST

विद्यापीठात आंदोलन कराचंय, तर अगोदर प्रशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवा. त्यानंतरच आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळेल, अन्यथा बेकायदेशीर आंदोलन केले म्हणून कार्यकर्त्यांना जेलची हवा खावी लागेल.

ठळक मुद्देफतवा : आधी विद्यापीठाची ‘एनओसी’ हवी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विद्यापीठात आंदोलन कराचंय, तर अगोदर प्रशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र मिळवा. त्यानंतरच आंदोलनाला पोलिसांची परवानगी मिळेल, अन्यथा बेकायदेशीर आंदोलन केले म्हणून कार्यकर्त्यांना जेलची हवा खावी लागेल.भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने २६ जुलै रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात निदर्शने केली जाणार आहेत. त्यासाठी या संघटनेचे अध्यक्ष किरण पंडित यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात निदर्शन आंदोलनाला पोलीस परवानगी मिळविण्यासाठी बेगमपुरा ठाण्यात अर्ज केला होता.दरम्यान, पोलीस निरीक्षकांनी किरण पंडित यांना परवानगी देण्याऐवजी एक पत्र दिले. त्यात म्हटले आहे की, आपणास निदर्शनासाठी पोलीस परवानगी पाहिजे, तर या आंदोलनासाठी विद्यापीठ प्रशासनाचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करावे लागेल. पोलिसांची ही अट पाहून किरण पंडित हे चकित झाले.या संदर्भात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेनेही नाराजी व्यक्त केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्त्वावर आधारित राज्यघटना दिली. त्यामुळे जगातील सर्वात मोठा लोकशाही मानणारा देश म्हणून भारताकडे बघितले जाते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावे चालणाऱ्या या विद्यापीठात विद्यार्थी, कर्मचारी किंवा प्राध्यापक संघटनांना आंदोलन, उपोषण, धरणे, निदर्शने करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाच्या परवानगीअगोदर विद्यापीठाचे नाहरकत प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जात आहे. ही बाब लोकशाहीला मारक आहे, अशी खंत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रमुख सचिन निकम यांनी व्यक्त केली.निर्णयाची प्रतीकात्मक होळी करणारसचिन निकम यांनी कळविले की, आंदोलन उभे होण्यापूर्वीच ते चिरडण्याचा हा प्रयत्न असून नाहरकत प्रमाणपत्राचा हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने कुलगुरूंची भेट घेऊन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या अशा दडपशाही भूमिकेच्या निषेधार्थ विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी एकवटले असून यासंदर्भात आंदोलन उभारण्यासाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना पुढाकार घेणार आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीagitationआंदोलन