शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

कुख्यात 'मेजर'ने जामीन मिळताच छत्रपती संभाजीनगरजवळ टाकला बनावट नोटांचा कारखाना

By सुमित डोळे | Updated: August 2, 2025 12:33 IST

२०१५ पासून दोन नावांनी मेजर रॅकेटमध्ये सक्रिय-अल्पवयीन मुलांचाही वापर, २०१९ पासून छत्रपती संभाजीनगरात सातत्याने तयार होताहेत बनावट नोटा

छत्रपती संभाजीनगर : शहरात प्रामुख्याने कोरोनाकाळापासून बनावट नोटांच्या छापखान्यांच्या रॅकेटमध्ये मोठी वाढ झाली. ऑक्टोबर २०२३ मध्ये पोलिसांना सर्वप्रथम या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अंबादास रामभाऊ ससाणे ऊर्फ अरुण भास्कर वाघ ऊर्फ मेजरचे (४५, रा. शहर टाकळी, ता. शेवगाव) नाव निष्पन्न झाले होते. त्यात अटक होऊन जामिनावर सुटल्यानंतर त्याने शहरातच राहत लाखोंच्या मशिनरी, प्रिंटरचा सेटअप उभारून बनावट नोटांचा छापखानाच उघडला. २०१९ पासून जवळपास ७ वेळा हे रॅकेट वारंवार उघडकीस येऊनही शहर पोलिसांसह एटीएसदेखील याची पाळेमुळे शोधण्यात अपयशी ठरले.

२७ जुलै रेाजी मेजरच्या टोळीतील २ एजंट निखिल गांगर्डे व सोमनाथ शिंदे यांना अहिल्यानगर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ४ दिवसांच्या चौकशीत बीडच्या प्रदीप कापरेसह शहरातील मंगेश शिरसाठ ( ४०, रा. शिवाजीनगर ), विनोद अरबट ( ५३, रा. सातारा), आकाश बनसोडे (२७, रा. पेठेनगर) , अनिल पवार ( ३४ रा. मुकुंदनगर ) यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले. ३१ जुलै रोजी तीसगावमध्ये पोलिस पोहोचल्याची कुणकुण लागताच मेजर पसार झाला, तर छापखाना बंद करून मेसवर जेवायला गेलेल्या अनिल, आकाशच्या सहायक निरीक्षक प्रल्हाद गिते यांनी मुसक्या आवळल्या.

तीन महिन्यांपूर्वी हलवला छापखानाससाणेने ३ महिन्यांपूर्वी तीसगावमध्ये निर्मनुष्य परिसरात आलिशान घर भाडेतत्त्वावर घेतले. या घराचा मालक शहरात राहत असल्याने त्यांना तेथे छापखाना उघडणे सुसह्य झाले. पोलिसांच्या पाहणीत मोठ्या आकाराचे प्रिंटर, विविध रंगाच्या नोटा छापता येतील अशा ४ रंगांच्या कॅन, कागदाचे गठ्ठे असा २८ लाखांचा मुद्देमाल आढळला.

कारागृहात मैत्री, जामिनासाठी मदतस्वत:ला मेजर म्हणवणारा ससाणे अरुण वाघ नावही वापरतो. २०२३ मध्ये मुकुंदवाडी पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर, २०२० पासून खुनाच्या गुन्ह्यात कारागृहातील आकाश बनसोडेसाेबत त्याची ओळख झाली. त्याचदरम्यान पवार हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात कारागृहात होता. तेथेच सर्वांची मैत्री झाली. काही महिन्यांपूर्वीच ससाणेने बनसोडेच्या जामिनासाठी मदत करून बाहेर आणले. त्यानंतर तिघांनी छापखाना सुरू केला.

अल्पवयीन मुलांचा वापर-ससाणेसह सर्व आरोपी फावल्या वेळेत प्लॉटिंग, वाहन खरेदी- विक्रीचे एजंट म्हणून काम करायचे. त्याच कामातून सर्व आरोपींची एकमेकांसोबत ओळख झाली.-ससाणे २०१५ पासून बनावट नोटांच्या रॅकेटमध्ये सक्रिय आहे. २०२३ मध्ये पकडला गेल्यानंतर त्याने शहरातील अनेक अल्पवयीन मुलांना यात सहभागी करून घेतले होते.

२०१९ पासून शहरात छापखान्यांची पार्श्वभूमी-नोव्हेंबर २०१९ मध्ये कोरोनाकाळात पुंडलिकनगर पोलिसांनी शेख समरान या उच्चशिक्षित तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना उघडकीस आणला.-डिसेंबर २०२१ मध्ये हाच समरान जामिनावर सुटताच पुन्हा सक्रिय झालेला निष्पन्न होत कारागृहात गेला.-ऑक्टोबर २०२३ मध्ये तत्कालीन पोलिस उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांनी सर्वप्रथम ससाणे ऊर्फ मेजरचे रॅकेट उघडकीस आणले.-२१ जुलै २०२३ मध्ये वैजापूरमध्ये उघडकीस आलेल्या रॅकेटमध्येही बीडपर्यंत धागेदोरे जात माजलगाव, परळीच्या तरुणांना अटक.-मार्च २०२४ मध्ये संतोष विश्राम शिरसाठ याला सिटीचौक पोलिसांनी बनावट नोटांसह पकडले.-एप्रिल २०२५ मध्ये बजाजनगर येथील बँकेच्या सीडीएम मशीनमध्ये बनावट नोटा आढळल्या.--जून २०२५ मध्ये छावणी बाजारात अहिल्यानगरचा राजन ब्राह्मणे बनावट नोटांसह सापडला. त्यात वाळूजचा माणिक आव्हाड हा देखील निष्पन्न झाला होता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर