शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

गुणवत्ता घसरल्यामुळे आणखी पाच शिक्षकांना नोटीस; ‘सीईओं’च्या आदेशाने कारवाई

By राम शिनगारे | Updated: March 27, 2024 13:47 IST

तपासणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथकाची स्थापना

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी भेट दिल्यानंतर गुणवत्ता प्रचंड घसरलेली असल्याचे त्यांना आढळून आले होते. लासूर स्टेशन येथील जि. प. शाळेलाही सीईओंनी भेट दिली तर प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी बोकूळ जळगाव येथील जि. प. शाळेला भेट दिली. या दोन्ही शाळांमध्ये गुणवत्ता घसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दोन शाळांतील पाच शिक्षकांना नोटीस देत गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांना १९ मार्च रोजी पाबळतांडा येथील जि. प. शाळेला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना शाळेतील २२ पैकी केवळ एकच विद्यार्थ्यास संख्या वाचन व गणितीय क्रिया करता आल्या. या प्रकरणात त्या शाळेतील सहशिक्षक दिलीप ढाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई सीईओंनी केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. विविध शिक्षक संघटनांनी ही सूडबुद्धीची कारवाई असल्याचे स्पष्ट करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही सीईओंच्या शाळांना गाठी-भेटी थांबलेल्या नाहीत. सीईओंनी लासूर स्टेशन येथील शाळेला भेट दिली असता, त्याठिकाणी गुणवत्ता घसरल्याचे दिसून आले. या शाळेतील दोन शिक्षकांना नोटीस देण्यात आली आहे. त्याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी बोकूळ जळगाव येथील शाळेला भेट दिली. तेथेही हीच परिस्थिती आढळून आली आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या तीन शिक्षकांना नोटीस दिल्यामुळे नोटीस पाठविलेल्या शिक्षकांची संख्या पाचवर पोहोचली आहे. तर एका शिक्षक नेत्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.

आता होणार शाळांची तपासणीसीईओ विकास मीना यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळांच्या तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यात एक पथकच नेमले आहे. या पथकात विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख असणार आहेत. हे पथक शाळांमधील गुणवत्ता तपासणी, भौतिक सुविधा आणि मतदान केंद्रांची तपासणी करणार आहेत.

२३४ शिक्षक शाळांमध्ये रुजूजिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमात २०४ आणि उर्दू माध्यमात ३०, असे एकूण २३४ शिक्षक रुजू झाले आहेत. तसेच उर्वरित शिक्षक लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरच रुजू होतील, असेही शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र