शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंच्या अचानक भेटीत गैरहजर १२ विभागप्रमुखांना नोटीस जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 19:50 IST

प्राध्यापकांचे सोडा, विभागप्रमुखच गैरहजर; यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रशासकीय विभागांना अचानकपणे भेटी दिल्यानंतर कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी नुकत्याच १६ विभागांना भेटी दिल्या. या १६ पैकी तब्बल १२ विभागांमध्ये प्रमुखच गैरहजर होते. त्यांना सूचनावजा नोटीस प्रशासनाने दिली आहे. यापुढे कुलगुरू थेट प्राध्यापकांच्या तासिकांमध्ये जाऊन बसणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.

डॉ. फुलारी यांनी 'नॅक'च्या निमित्ताने विभागांना अनेक भेटी दिल्या. 'नॅक'कडून मूल्यांकन होण्यापूर्वीही त्यांनी अनेकदा प्रशासकीय विभागांना भेटी देऊन जागेवर हजर नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. त्याच वेळी विद्यापीठातील काही विभागांमध्ये विद्यार्थ्यांच्या तासिका होत नसल्याची चर्चाही सुरू होती. त्याचा परिणामही विद्यार्थी संख्या कमी होण्यात झाल्याचा निष्कर्ष काढण्यात येत होता. त्यामुळे 'नॅक'चे मूल्यांकन झाल्यानंतर कुलगुरू डॉ. फुलारी यांनी त्याकडे सर्वाधिक लक्ष देण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार मागील महिन्यात कुलगुरूंनी तासिकांना सुरुवात होण्यापूर्वी १६ विभागांना अचानकपणे भेटी दिल्या. या भेटीमध्ये चक्क १२ विभागांमध्ये विभागप्रमुखच अनुपस्थित होते. ज्यांच्याकडे विभागाची धुरा सोपविण्यात आलेली आहे तेच वेळेवर येत नसतील तर प्राध्यापकांना काय बोलावे, असा प्रश्न पडला. विशेष म्हणजे त्यातील बहुतांश विभागप्रमुख हे वरिष्ठ श्रेणीतील प्राध्यापक आहेत. त्यामुळे संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.

१०० पेक्षा अधिक शिक्षकेतरांना नोटीसकुलगुरू डॉ. फुलारी यांनी भेट दिल्यानंतर उशिरा आलेले, गैरहजर असलेल्या १०० पेक्षा अधिक कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही यापूर्वीच नोटीस बजावण्यात आल्याची माहिती कुलसचिव कार्यालयातून देण्यात आली.

सीसीटीव्ही बसविणारविद्यापीठातील प्रत्येक विभागांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. त्याचे नियंत्रण कुलगुरू कार्यालयाला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे कुलगुरूंना कार्यालयात बसूनही कोणत्या विभागात कोणते प्राध्यापक तासिका घेत नाहीत, याची माहिती सहज मिळेल.

विद्यार्थ्यांसोबत तासिकांना बसणारकुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी विद्यापीठातील कोणत्याही विभागात सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या तासिकांना विद्यार्थ्यांसाेबत बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आगामी काळात विभागातील वेळापत्रकानुसार कुलगुरू प्राध्यपकांच्या तासिकांना हजेरी लावणार असल्याचेही समजते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर