शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याने केंद्र व राज्य शासनाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 11:57 IST

crop insurance news : शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळू नयेत आणि कंपनीचा फायदा व्हावा, यासाठी खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

ठळक मुद्दे सिल्लोड तालुक्यातील १ लाख १८,४०२ शेतकरी पीक विम्यापासून वंचितपीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याबाबत दाखल जनहित याचिका

औरंगाबाद : विम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमीयम) ४ कोटी ७९ लाख ८९९०.९० रुपये भरलेले असूनही औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधीला १ लाख १८ हजार ४०२ शेतकरीपीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याबाबत दाखल जनहित याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. एन. लड्डा यांनी प्रतिवाद्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. या याचिकेवर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी अपेक्षित आहे. ( Aurangabad High Court's Notice to Central and State Governments for depriving farmers of crop insurance compensation ) 

काय आहे याचिकाकेंद्र शासनाच्या पीक विमा योजनेअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील १ लाख १८ हजार ४०२ शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी एचडीएफसी इरगो विमा कंपनीकडे पीक विम्याच्या हप्त्यापोटी (प्रिमीयम) ४ कोटी ७९ लाख ८९९०.९० रुपये भरले आहेत. असे असताना २०२० साली अतिवृष्टीमुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊनही शेतकरी पीक विमा भरपाईपासून वंचित ठेवल्याबाबत देवीदास हरिभाऊ लोखंडे व इतर २८ शेतकऱ्यांनी ॲड. सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचा आरोपराज्य शासनाने २९ जून २००० च्या शासन निर्णयानुसार पीक विम्याची तरतूद केली आहे. याचिकाकर्त्यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता सिल्लोड तालुक्यातील ग्रामसेवक, सरपंच आणि पोलीस पाटील हजर नसताना, पीक पाहणीच्या तारखांपूर्वीच पंचनामे तयार केले असल्याचे निदर्शनास आले. यावरून शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळू नयेत आणि कंपनीचा फायदा व्हावा, यासाठी खोटे व बनावट पंचनामे तयार केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

यांना नोटिसा बजावण्याचा आदेशखंडपीठाने केंद्रिय कृषी मंत्रालयामार्फत केंद्र शासन, कृषी विभागाच्या सचिवांमार्फत राज्य शासन, कृषी आयुक्त, औरंगाबादचे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, सिल्लोडचे गट विकास अधिकारी, कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक आणि एचडीएफसी इरगो विमा कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमाagricultureशेती