शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफिया नव्हे; दहशतवादीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:06 IST

तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती वाळू तस्करीची झाली आहे.

मोबीन खान ।लोकमत न्यूज नेटवर्कवैजापूर : तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती वाळू तस्करीची झाली आहे. जिवाचा थरकाप उडेल, इतकी वाळू माफियांची दहशत वैजापुरात दिवसेंदिवस वाढत आहे.दोन दिवसांपूवीच म्हणजे रविवारी सायंकाळी नायब तहसीलदार रमेश भालेराव हे वाळू तस्करी रोखण्यासाठी शिवना नदी पात्रात गेले असता त्यांच्यावर वाळू माफियांसह शंभर ते सव्वाशे लोकांच्या जमावाने हल्ला करुन हुसकावण्याचा प्रकार घडला. यावरुन वाळू तस्करांची दादागिरी किती वाढली आहे, हे लक्षात येथे.या प्रकरणी जवळपास सव्वाशे लोकांवर देवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वैजापूर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले.त्यामुळे त्या दिवशी तालुक्यातील तहसीलसह सर्वच तलाठी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.संघटित गुन्हेगारीतालुक्यात जमिनीच्या विक्रीप्रमाणेच, वाळू उत्खननाच्या बेकायदा आणि संघटित पद्धतीच्या व्यवसायाने हात-पाय पसरले आहेत. तेथे वाळू माफियांचा शिरकाव झपाट्याने झाला आहे. तरीही वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी महसूल यंत्रणा कमी पडते, हे कोणीही नाकारू शकत नाही. खरे तर, हे बेकायदा धंदे फोफावण्याची प्रमुख कारणे वरिष्ठ पातळीपर्यंतचा भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव हीच आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकार स्थानिक पातळीवर कसे रोखणार, हाही एक प्रश्नच आहे. कारण या साºया प्रकारांची पाळेमुळे थेट वरपर्यंत आहेत. महसूल यंत्रणा राजकीय दबावाखाली वावरत असल्यामुळे दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी वाढली आहे.तालुक्यात दरवर्षी वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे रडगाणे प्रशासनाकडून गायले जात असताना गोदावरी व शिवना नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास चोरीच्या वाळूची वाहतूक सुरूच आहे. मात्र, महसूल विभागातील काही कर्मचारी स्वत:च्याच तुंबड्या भरण्यात मश्गूल असल्याने शासनाला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. विशेष म्हणजे महसूल विभागातील अधिकाºयांनी त्यांची कामे करण्यासाठी कंत्राटी व काही खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच तहसीलची कामे सांभाळत असल्याचे चित्र आहे. हे अनधिकृत कर्मचारी अधिकाºयांचे व महसूल पथकातील सर्व काम सांभाळतात.‘मलाई’दार धंद्यामुळे प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’या मुजोर तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला का यश येत नाही, हे मोठे कोडे आहे. तसे पाहिले तर या धंद्यात मोठी ‘मलाई’ असल्याने प्रशासनही ‘दुर्लक्ष’ करते, यामुळेच या तस्करांना अभय मिळत असल्याने त्यातूनच ही हल्ल्याची घटना घडली असावी, अशीही चर्चा होत आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी