शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

केवळ दारू मुळेच नव्हे तर तब्बल ३०० कारणांनी यकृत होते खराब  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 17:56 IST

केवळ दारूमुळे यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये गैरसमज आहे; परंतु एक नव्हे तब्बल ३०० कारणांनी यकृत खराब होते.

ठळक मुद्दे८० टक्के यकृत खराब झाल्यानंतर लक्षणे दिसतात.आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे उपचार शक्य

औरंगाबाद : केवळ दारूमुळे यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये गैरसमज आहे; परंतु एक नव्हे तब्बल ३०० कारणांनी यकृत खराब होते. विशेष म्हणजे ८० टक्के यकृत खराब झाल्यानंतर लक्षणे दिसतात. त्यानंतरही आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे उपचार शक्य आहे. यकृत प्रत्यारोपणाचाही पर्याय आहे; परंतु अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे यकृत मिळण्याच्या प्रतीक्षेतच अनेकांचा मृत्यू ओढावतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.

फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबाद आणि कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे रविवारी (दि.२०) यकृताचे आजार, निदान आणि उपचारासंबंधी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुंबई येथील डॉ. समीर शाह, डॉ. आकाश शुक्ला, डॉ. वैशाली सोलाव, डॉ. अनुराग श्रीमाल, डॉ. सचिन पळणीटकर, फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी,  आयोजन सचिव डॉ. वैभव गंजेवार आदी उपस्थित होते. 

डॉ. आकाश शुक्ला म्हणाले, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, आनुवंशिक आजार अशा अनेक कारणांनी यकृत खराब होते; परंतु वेळीच निदान आणि उपचाराने यकृत चांगले राहू शकते. अन्यथा यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादला यकृत प्रत्यारोपण शक्य झाले असून, वर्षाला जवळपास तीनशे प्रत्यारोपण होतात. वर्षाला सातशेपेक्षा अधिक लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते. गरजूंची संख्या अधिक ५५ वर्षे वयापर्यंतचा व्यक्ती गरजूला यकृतदान करू शकतो. यामध्ये यकृताचा काही भाग दिला जातो. दात्याचे यकृत काही दिवसांनंतर पूर्वीप्रमाणे होते, तर गरजूला जीवदान मिळते, असे ते म्हणाले.

डॉ. समीर शाह म्हणाले, कावीळच्या विषाणूंमुळे यकृत खराब होऊ शकते. यकृतास सूज आली तर त्याचे कारण शोधले पाहिजे. आरोग्यदायी आयुष्य, मद्यपान टाळणे, मधुमेह, रक्तदाब कमी करणे हे यकृत सुदृढ राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. डॉ. अनुराग श्रीमाल म्हणाले, यकृत खराब झालेल्यांसाठी अवयवदान जीवनदान ठरते; परंतु गरजंूची संख्या अधिक आहे. त्यामुळे यकृताच्या प्रतीक्षेतच अनेकांचा मृत्यू होतो. अवयवदान वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. परिसंवादास मराठवाड्यातून मोठ्या संख्येने तज्ज्ञांची उपस्थिती होती. 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर