शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

'कमळ नाही तर बाण'; अखेर अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 13:07 IST

भाजपच्या टोलवा-टोलवीला कंटाळून सत्तार शिवबंधनात 

ठळक मुद्देरविवारी सायंकाळीच सत्तार तातडीने विमानाने मुंबईला रवाना 

औरंगाबाद : सिल्लोडचे आ.अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. रविवारी सायंकाळीच ते तातडीने विमानाने मुंबईला रवाना झाले होते. यावरून सत्तार यांच्या भाजप सोडून शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.  

कमळाबाई घाले डोळा, सत्तारांना लागला लळा

लोकसभा निवडणुकीपासून आ.सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. परंतु त्यांचा भाजप प्रवेश अनिश्चित राहिला. महाजनादेश यात्रेत तरी मुख्यमंत्री आपल्याला भाजपात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतील, असे आ. सत्तार यांना वाटले होते. परंतु सत्तार यांना फक्त यात्रेतील रथात मुख्यमंत्र्यांसोबत उभे राहण्याची संधी मिळाली. सिल्लोड भाजपचा सत्तार यांना कडाडून असलेला विरोधच त्यांच्या प्रवेशाच्या आड येत असल्याचे कळते. दरम्यान, या टोलवा-टोलवीला कंटाळून सत्तार यांनी शिवबंधन बांधण्याचे निश्चित केले.

सिल्लोडची जबाबदारी सत्तार यांच्याकडे मनात एक आणि ओठावर एक अस करणारा हा माणूस नाही. सिल्लोड मतदारसंघ पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकत असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.  

संकटाच्या काळात शिवसेना शेतकऱ्यांसोबत दुष्काळ, कर्जमाफी,नापिकी आदी समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कायम शेतकऱ्यांसोबत राहिली. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सत्तेची पर्वा न करता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठे काम केले असल्याचे सत्तार यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले.   

तनवाणी यांच्या नावाचीही चर्चाआ.सत्तार आणि माजी आ.किशनचंद तनवाणी हे शिवबंधनात अडकणार असल्याची चर्चा रविवारी दिवसभर होती. भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी आ.तनवाणी म्हणाले, मी औरंगाबादेतच आहे. माझ्या नावाने चुकीची माहिती पसरविली जात आहे.महाजनादेश यात्रा व सभेचे नियोजन मध्य मतदारसंघात केले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे नियोजन माझ्याकडेच होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: मला यात्रेत रथामध्ये बसण्यासाठी बोलावून घेतले. हे सगळे होत असताना मी भाजपतून कसा जाणार. आता माझा पक्ष भाजपच आहे व मी येथेच राहणार आहे. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद