शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कचरा नव्हे, सोनेच!; औरंगाबादमध्ये आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 15:09 IST

कचर्‍याची कोंडी फुटावी या दृष्टीने महापालिका काम करायला तयार नाही. उलट महापालिकेसाठी कचरा सोन्याची खाण ठरत आहे.

ठळक मुद्देकच-याचे अर्थकारण : आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील एक महिन्यापासून कचराकोंडीने त्रस्त झालेले आहेत. कचर्‍याची कोंडी फुटावी या दृष्टीने महापालिका काम करायला तयार नाही. उलट महापालिकेसाठी कचरा सोन्याची खाण ठरत आहे. कचरा उचलण्याच्या प्रक्रियेच्या मुळाशी गेल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये कचरा उचलण्यासाठी भाडेतत्त्वावर तब्बल १३६ रिक्षा घेण्यात आल्या आहेत. एका रिक्षाचे भाडे महिना २७ हजार रुपये आहे. वर्षाला रिक्षाच्या भाड्यापोटी मनपा ४ कोटी ४७ लाख रुपये खर्च करीत आहे. याशिवाय आणखी बरीच वाहने भाडेकरारावर घेतली आहेत. सर्वांचे वर्षाला भाडेच दहा कोटी रुपये होत आहे.

शहरातील कचराकोंडी फुटावी असे मनपालाही वाटत नाही. कचरा प्रश्नाच्या नावावर सुरू असलेली दुकानदारी आणखी कशी मोठी होईल, याचाच विचार अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. कचरा उचलण्याच्या कामाचे चक्क आऊटसोर्सिंग केले आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमून ठेवला आहे. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून या प्रक्रियेत काम करणार्‍या मंडळींनी ‘भर अब्दुल्ला...’ याप्रमाणे कचर्‍याला सोन्याची खाणच बनवून टाकले आहे. 

११५ वॉर्डांमधील कचरा उचलण्यासाठी मनपाच्या यांत्रिकी, घनकचरा विभागाने २४५ रिक्षा कामाला लावल्या आहेत. त्यातील १३६ रिक्षा भाडेतत्त्वावरील आहेत. एका रिक्षाचे भाडे दररोज ९०० रुपये आहे. महिन्याला २७ हजार, वर्षाला ३ लाख २४ हजार रुपये एका रिक्षापोटी मनपा खर्च करीत आहे. एका वॉर्डाला दोन, तर काही वॉर्डांना तीनही रिक्षा देण्यात आल्या आहेत. १३६ रिक्षांचे महिन्याला भाडे ३७ लाख २६ हजार रुपये होते. वर्षाला ही रक्कम ४ कोटी ४७ लाखांपर्यंत जाते. रिक्षांची संख्या अधिक दाखवून निव्वळ मनपाच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचा आरोपही होत आहे. मनपा भाड्यावर जेवढा पैसा खर्च करते तेवढ्या रकमेत तर नवीन रिक्षांची खरेदी झाली असती.

डम्पर, ट्रॅक्टरचे स्वतंत्र कंत्राटवॉर्डांमध्ये जमा झालेला कचरा उचलण्यासाठी ४० ते ५० मोठी वाहने भाडेकरारावर लावली आहेत. या कामावरही दरवर्षी २ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात येत आहे. ही वाहने नेमकी कुठे आणि कधी धावतात, हे फक्त यांत्रिकी विभागालाच माहीत.

चालकही आऊटसोर्सिंगवरभाडेतत्त्वावर घेण्यात आलेली काही वाहने चालविण्यासाठी आणखी एका कंत्राटदाराकडून वाहनचालक घेण्यात आले आहेत. त्यांच्या पगारापोटी दरमहा लाखो रुपये मनपाला द्यावे लागत आहेत.

कंत्राटदारांची लागली रांगकचर्‍यावर प्रक्रिया करणे, यंत्रसामग्री खरेदी करा, असे म्हणत मनपाकडे आतापर्यंत ७० पेक्षा अधिक प्रस्ताव आले आहेत. दररोज किमान आठ ते दहा कंत्राटदार वेगवेगळे प्रकल्प घेऊन मनपात येत आहेत.प्रत्येक जण कचर्‍यावर प्रक्रिया करणारे आपले टेक्निक सर्वोत्तम असल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे मनपाला शहरातील कचरा आणखी सोन्याची खाण असल्याचे वाटू लागले आहे.सोमवारी महापालिकेने कचर्‍यापासून वीजनिर्मितीसाठी इच्छुक कंपन्यांचे प्रस्ताव मागविल्याचे जाहीर केले. मात्र, निविदेत नेमके असे काहीच म्हटले नाही. कचर्‍यावर प्रक्रिया एवढेच लिहिले आहे.