शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘ग्रामीण विकास’ची वेतनकोंडी; औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीचा कर्मचार्‍यांच्या वेतन तरतुदीसाठी असहकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 17:48 IST

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीने निधीची तरतूद करण्याबाबत असहकाराची भूमिका घेतल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. 

औरंगाबाद : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत कार्यरत अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीने निधीची तरतूद करण्याबाबत असहकाराची भूमिका घेतल्यामुळे मागील तीन महिन्यांपासून या विभागाचे कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. 

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डीआरडीए) बंद होणार की चालू राहणार याबद्दलचा संभ्रम कायम आहे. या विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या अनेक योजना हळूहळू बंद करण्यात आल्या आहेत. सध्या ‘डीआरडीए’मार्फत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजना, या दोन महत्त्वाच्या योजना राबविल्या जात आहेत. ‘डीआरडीए’ बंद करण्याच्या शासनाच्या कोणत्याही सूचना अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत, पण या विभागाच्या अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी शासनाने अर्थसंकल्पीय तरतूद केलेली नाही. त्यामुळे सातत्याने या विभागातील कर्मचार्‍यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होत आहे. आतापर्यंत योजनांसाठी प्राप्त झालेल्या निधीतील उसनवारी करून वेतन अदा केले जात होते. आता अवघ्या दोनच योजना शिल्लक राहिल्यामुळे त्यांचा निधीही उसनवारीने घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे मागील नोव्हेंबर महिन्यापासून कर्मचार्‍यांवर वेतनपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

नुकतेच ग्रामविकास विभागाने एका पत्राद्वारे जिल्हा नियोजन समितीला सूचना दिल्या की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकारी- कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी निधीची तरतूद करावी. यासंबंधी ग्रामीण विकास यंत्रणेने वेतनासाठी निधीचा प्रस्तावही सादर केला; पण जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी तो पत्रव्यवहार गुलदस्त्यात टाकल्याचा आरोप कर्मचार्‍यांनी केला आहे. 

वेतनासाठी लागतात वार्षिक दीड कोटीजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत सध्या २६ अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. यांच्या वेतनासाठी वार्षिक दीड कोटी रुपयांचा निधी आवश्यक आहे. मात्र, शासनाकडून वेतनासाठी अवघे १०-१५ लाखांची तरतूद करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक वेळी कर्मचार्‍यांची वेतनकोंडी होत असल्याची भावना कर्मचार्‍यांनी बोलून दाखविली. 

ग्रामविकास विभागाने या कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी जिल्हा नियोजन समितीने तरतूद करावी, अशा सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनीही वेतनासाठी निधीची तरतूद करण्याची भूमिका घेतली; पण जिल्हा नियोजन अधिकार्‍यांनी मात्र असहकाराची भूमिका घेतल्याचेही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMONEYपैसा