शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘नो वर्क, नो पे’;  मराठवाड्यात शासन करणार दररोज २ कोटींचे वेतन कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 17:03 IST

या संपाला शासनाने गांभीर्याने मनावर घेत ‘नो वर्क, नो पे’ (काम नाही, तर दाम नाही) या भूमिकेने संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कपातीचे आदेश जारी केले आहेत.

ठळक मुद्दे मराठवाड्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांचे सुमारे १६ हजार कर्मचारी आहेत त्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या तीन दिवसांत शासनाच्या विरोधात संपाला मंगळवारपासून सुरुवात केली

औरंगाबाद : मराठवाड्यात सर्व प्रशासकीय यंत्रणांचे सुमारे १६ हजार कर्मचारी असून, त्यांनी ७ ते ९ आॅगस्ट या तीन दिवसांत शासनाच्या विरोधात संपाला मंगळवारपासून सुरुवात केली आहे. या संपाला शासनाने गांभीर्याने मनावर घेत ‘नो वर्क, नो पे’ (काम नाही, तर दाम नाही) या भूमिकेने संपकरी सरकारी कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कपातीचे आदेश जारी केले आहेत. २५ ते ४० हजार यादरम्यान वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांची तीन दिवसांतील सरासरी वेतन कपात केली तर दररोज २ कोटींच्या आसपास वेतन कपात होण्याची शक्यता आहे. अंदाजे ६ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत वेतनकपातीमुळे तीन दिवसांत पडतील. 

शासनाच्या अखत्यारीत सुमारे ४० ते ४२ विभाग आहेत. या विभागाचे मराठवाड्यात १६ हजार कर्मचारी राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेशी संलग्न आहेत. त्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शासनाच्या विरोधात संपाचा यल्गार पुकारला आहे. संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांची यादी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी विभागीय पातळीवर सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. सायंकाळपर्यंत प्राप्त यादीनुसार महसूल कर्मचाऱ्यांचा संप १०० टक्के यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. ५ हजार ५९४ महसूल कर्मचाऱ्यांचे संपकाळातील वेतन कापण्यात येणार आहे. उर्वरित १० हजार कर्मचारी जिल्हा परिषद, आरोग्यसेवा, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम विभागातील असून त्यांच्यावर देखील वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जिल्हा प्रशासनाची भिस्त ६२ कर्मचाऱ्यांवरसंपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हा प्रशासनाची भिस्त फक्त ६२ कर्मचाऱ्यांवर होती. ब संवर्गातील १९, क संवर्गातील ७१८ आणि ड संवर्गातील १३० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. ९४१ पैकी ८६७ कर्मचऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला. १२ कर्मचारी पूर्वपरवानगीने रजेवर आहेत. ६२ कर्मचाऱ्यांवर जिल्ह्यातील पूर्ण यंत्रणा होती. त्यामुळे महसूल कामकाज पूर्णपणे ढेपाळले होते. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी सांगितले, महसुली कर्मचारी संपामुळे सर्व कामांवर परिणाम झाला आहे. काम नाही, तर वेतन नाही, असे शासनाचे आदेश असल्यामुळे संपकाळात कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होऊ शकते. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात गृहशाखा, महसूल शाखा, सामान्य प्रशासन, नियोजन, अभिलेख, निवडणूक विभाग कर्मचाऱ्यांअभावी ओस पडले होते. संघटनेने दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारासमोर जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली. यामध्ये अध्यक्ष महेंद्र गिरगे, डी.एम. देशपांडे, संतोष अनर्थे आदी पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

टॅग्स :StrikeसंपState Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारी