शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

युद्ध नको, बुद्ध हवा : बुद्धांच्या जयंतीनिमित्त पाली भाषा संवर्धनाचा संकल्प

By विजय सरवदे | Updated: May 5, 2023 20:43 IST

‘बुद्धं, शरणं, गच्छामी’ या स्वरांनी वातावरण मंगलमय

छत्रपती संभाजीनगर : जगाला दया, क्षमा, शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त शुक्रवारी पूजापाठ, बुद्धवंदना, परित्रणपाठ, धम्मदेसना आणि मिरवणुका, या मंगलमय वातावरणाने संपूर्ण शहर न्हाऊन निघाले. पहाटेपासूनच ‘बुद्धं, शरणं, गच्छामी’ हा मंगल ध्वनी कानावर पडताच तथागतांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी उपासक- उपासिकांची पावले विहारांकडे वळाली. विशेष म्हणजे, या दिवशी सर्वांनीच पाली भाषा संवर्धनाचा संकल्प केला.

क्रांतिचौकातून धम्म मिरवणूक

भिक्खू संघाच्या वतीने सकाळी ८.३० वाजता क्रांतीचौक येथे बुद्ध मूर्तीची पूजा करण्यात आली. त्यानंतर सजविलेल्या रथातून बुद्ध मूर्तीच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. या मिरवणुकीत भदन्त बोधिपालो महाथेरो, भदन्त डॉ. एम. सत्यपाल महाथेरो, भन्ते नागसेन थेरो, भन्ते ज्ञानरक्षित थेरो, भन्ते करुणानंद थेरो, भन्ते धम्मज्योती थेरो, भन्ते धम्मबोधी थेरो, भन्ते एन. धम्मानंद व भिक्खू संघ, श्रामणेर संघ, डॉ. हृषिकेश कांबळे, अशोक येरेकर, जालिंदर शेंडगे यांच्यासह उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. भडकल गेटजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या धम्म मिरवणुकीची सांगता झाली.

पोलिस आयुक्तालयात भिक्खू संघाचे भोजनदान आटोपल्यानंतर ही रॅली नागसेनवनात गेली. तिथे बोधीवृक्षाखाली दिवसभर भिक्खू संघाने धम्मदेसना दिली. यावेळी देखील शहरातील उपासक-उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जनगणनेत पाली भाषेचा उल्लेख करावा

नागसेनवन येथील बोधीवृक्षाखाली धम्मदेसनेत भन्ते धम्मज्योती यांनी उपदेश केला की, ज्या भाषेत बौद्धधम्माचे सर्व साहित्य उपलब्ध आहे. ती भाषा अवगत झाली, तरच आपणास तथागतांचे विचार समजू शकतील व बुद्धांच्या विचाराचे अनुकरण करता येईल. जेव्हा केव्हा जनगणना होईल, तेव्हा पाली भाषा अवगत असल्याचे नमूद करा तेव्हाच सरकार दरबारी या भाषेच्या संवर्धनाचा विचार होऊ शकतो. वर्षावासाच्या काळात पाली भाषा शिकण्यासाठी ऑनलाईन तासिका घेतली जाणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.सिद्धार्थ उद्यानात बुद्धांचा जयघोष

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सकाळी ९.३० वाजता क्रांती चौक येथून बुद्ध मूर्तीची मिरवणूक निघाली. ती पैठणगेट, औरंगपुरा, भडकलगेटमार्गे सिद्धार्थ उद्यानात पोहोचली. या मिरवणुकीत अशोक कांबळे बौद्ध, डी. एल. अंभोरे, विठ्ठल तुपसागर, प्रमोद पवार, डी.आर. सरदार, एम. एम. ढगे, रमेश बनसोडे, डी. व्ही. थोरात आदींसह उपासक- उपासिका, श्रामणेर संघ, भिक्खू संघ मोठ्या संख्येने सहभागी होता. उद्यानात बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष किशोर जोहरे यांनी पंचशील ध्वजारोहण केले. भिक्खू संघाने बुद्धवंदना घेतली. समता सैनिक दलाचे कॅप्टन विलास पठारे यांच्या नेतृत्वाखली मानवंदना देण्यात आली. तिथे दिवसभर धम्मदेसना, खिरदान, भोजनदानाचा कार्यक्रम चालला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा