शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर नसणार ‘टोल प्लाझा’चा अडथळा; मात्र प्रवास असेल खर्चीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2021 16:00 IST

Samrudhi Highway : ‘नागपूर ते मुंबई’ हे ७०१ किमीचे अंतर असून, ताशी १५० किमी या वेगाने वाहन धावण्याची क्षमता या महामार्गाची असेल.

- विजय सरवदेऔरंगाबाद : समृद्धी महामार्गाचे (Samrudhi Highway) काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या शीघ्रगती महामार्गावरून वाहनधारकांना विनाअडथळा प्रवास करता यावा, यासाठी महामार्गावर कुठेही ‘टोल प्लाझा’ नसेल (No 'Toll Plaza' obstruction on Samrudhi Highway). महामार्गावरून बाहेर पडताना इंटरचेंजच्या ठिकाणी ‘सर्व्हिस रोड’वर टोलबूथ असणार आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या या समृद्धी महामार्गावर सध्या ४ ठिकाणी टोल प्लाझा चालविण्यासाठी निविदा प्रक्रियेचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) मुख्यालयस्तरावर सुरू आहे.

नागपूर ते मुंबई’ हे ७०१ किमीचे अंतर असून, ताशी १५० किमी या वेगाने वाहन धावण्याची क्षमता या महामार्गाची असेल. या समृद्धी महामार्गावर एकूण २४ ठिकाणी इंटरचेंजेस आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव व जांबरगाव या चार ठिकाणी इंटरचेंजेस उभारण्याचे कामही अंतिम टप्प्यात असून, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत इंटरचेंज उभारण्यासाठी भूसंपादनाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. इंटरचेंजपासूनच वाहनधारकांना या महामार्गावर प्रवेश करता येईल व बाहेरही पडता येणार आहे. या महामार्गावर अन्य कोठूनही प्रवेश करता येणार नाही किंवा बाहेरही पडता येणार नाही. तथापि, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या महामार्गावरील प्रवास वाहनधारकांना चांगलाच खर्चीक ठरणार आहे. १.६५ रुपये प्रतिकिमी या दराने टोल आकारण्यात येणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावर ‘एक्झिस्ट बेस टोल’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. ज्यामुळे वाहनधारकांना विनाअडथळा अखंडपणे प्रवास करता येईल. सध्या राज्यामध्ये ‘एन्ट्रिबेस टोल’ अर्थात महामार्गावरून प्रवास करतानाच टोलसाठी थांबावे लागते. अनेकदा टोल प्लाझावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. या महामार्गाची संकल्पना मुळातच ‘सुपर एक्स्प्रेस-वे’ (शीघ्रगती महामार्ग) असल्यामुळे या महामार्गावरून प्रवास करताना टोलसाठी कुठेही थांबावे लागणार नाही. या महामार्गावर जेथून प्रवेश केला, तिथे संबंधित वाहनांची नोंद होईल व जिथे ते बाहेर पडेल तिथे ‘सर्व्हिस रोड’वर उभारण्यात आलेल्या टोलबूथवर प्रवास केलेल्या किलोमीटरनुसार ‘फास्ट टॅग’द्वारे आपोआप टोलची रक्कम कपात केली जाईल. सध्या टोल प्लाझा व पंप चालवण्यास देण्यासाठी ‘एमएसआरडीसी’च्या मुख्यालयस्तरावर निविदाप्रक्रिया राबविण्याचे काम सुरू आहे. साधारणपणे ५० ते ६० किलोमीटर अंतरावर पेट्रोलपंप असेल. पेट्रोल उत्पादक कंपन्यांनाच या महामार्गावर पंप चालविण्यासाठी दिले जाणार आहेत.

असा आहे समृद्धी महामार्ग: - जिल्ह्यातून ११२ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग- एकूण १२० मीटर रुंदीचा ६ पदरी रस्ता असेल- पोखरी शिवारात २९० मीटर लांबीचा बोगदा अंतिम टप्प्यात- सावंगी, माळीवाडा, हडस पिंपळगाव, जांबरगाव या ५ ठिकाणी इंटरचेंजचे काम अंतिम टप्प्यात- महामार्गालगतच्या गावांमधील पादचाऱ्यांसाठी, वाहनांसाठी व प्राण्यांसाठी एकूण १२५ अंडरपास- जिल्ह्यात औरंगाबाद, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील ७१ गावांमधून गेला समृद्धी महामार्ग

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादnagpurनागपूर