शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

तोडगा नाहीच ! स्वस्त धान्य दुकानदारांच्या संपाने मोफत धान्य वाटपाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 12:25 IST

शिवसेना, भाजपा आमदारांना भेटून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी.एन. पाटील यांनी आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे यांना रविवारी निवेदन देऊन शासनाकडे बाजू मांडण्याची मागणी केली

ठळक मुद्देमहासंघाचे भाजपा, शिवसेना आमदारांना निवेदनमागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नाही

औरंगाबाद : जिल्ह्यातील १,८०२ स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीनवरून धान्य वाटप विरोधासह विमा व इतर मागण्यांसाठी १ मेपासून संप पुकारल्यामुळे मोफत धान्य योजनेला ब्रेक लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लॉकडाऊनमध्येच दुकानदारांनी संप सुरू केल्यामुळे प्रशासनाची कोंडी, तर रेशनच्या धान्यावरच दीनचर्या असलेल्या जनसामान्यांचे हाल होत आहेत.

शिवसेना, भाजपा आमदारांना भेटून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघाचे अध्यक्ष डी.एन. पाटील यांनी आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाट, आ. अंबादास दानवे यांना रविवारी निवेदन देऊन शासनाकडे बाजू मांडण्याची मागणी केली, तसेच वैजापूर तालुक्यातील दुकानदारांनी आ. रमेश बोरनारे यांच्याकडे निवेदनासह सर्व ई-पॉस मशीन तहसील कार्यालयात जमा केल्या. तहसीलदार गायकवाड यांनी संप मागे घेण्याची दुकानदारांना विनंती केली. मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचे तालुकाध्यक्ष व्यवहारे यांनी तहसीलदारांना सांगितले.अध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वात आमदारांना शासनाकडे मागण्या मंजूर करण्यासाठी पाठपुरावा यासाठी शिष्टमंडळ भेटले. यावेळी कार्याध्यक्ष मधुकर चव्हाण, मिलिंद पिंपळे, ललित पाटणी, उमेश चुडीवाल, सचिन करोडे, अनिता मंत्री आदींची उपस्थिती होती.

अद्याप मागण्या मंजूर केल्या नाहीतरेशन दुकानदारांच्या मागण्या अद्याप मंजूर केलेल्या नाहीत. त्यामुळे संप सुरूच राहणार आहे. आ. शिरसाट यांनी मागण्या रास्त असून, पुरवठामंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे नमूद केले, तर आ. दानवे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलून याप्रकरणी बैठक घेण्याची सूचना केली. आ. सावे यांनी शासन आणि पुरवठा मंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले. सोमवारी दोन्ही खासदारांना महासंघाचे शिष्टमंडळ भेटणार असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबाद