शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही’; सतीश चव्हाण यांची घणाघाती टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 18:45 IST

‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण यांना सहज देता आले असते; परंतु राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण न्यायप्रविष्ट करून टाकण्यात आले. अशा तिखट शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

औरंगाबाद : ‘या सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचे नाही. मराठा आरक्षण यांना सहज देता आले असते; परंतु राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून ते प्रकरण न्यायप्रविष्ट करून टाकण्यात आले. धनगर आरक्षणाच्या बाबतीतही तेच घडतेय. आता महादेव जानकरसुद्धा तोंड लपवून फिरताहेत. धनगर समाजाच्या मेळाव्यांना जायचे टाळताहेत. मुस्लिम आरक्षण तर यांना द्यायचेच नाही, अशा तिखट शब्दांत मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 

उद्यापासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या पावसाळी अधिवेशनास रवाना होण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी संघभूमी नागपूर येथून केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यासाठी नागपूरला पावसाळी अधिवेशन घेतले जात आहे. मात्र, चार वर्षांत औरंगाबादला मंत्रिमंडळाची एक बैठक घ्यायला यांना वेळ मिळाला नाही. दरवर्षी हे बैठक घेऊ शकले नाहीत, अशी खंत व्यक्त करून चव्हाण यांनी आरोप केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्व योजना नागपूरला पळविण्याच्या मागे आहेत. स्पाचा साधा प्रस्तावही या सरकारने केंद्राकडे पाठवला नाही. आता याला तीन वर्षे झाली. आयआयएमही असेच पळविले गेले.खैरेंनी पिठाची गिरणी तरी आणली का ? कोण खैरे? हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली मते लुबाडण्याचा त्यांचा धंदा... चार-चार वेळा निवडून येऊनही यांनी एक साधी पिठाची गिरणी तरी आपल्या मतदारसंघात आणली का? त्यापेक्षा जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे बरे! त्यांनी तरी काही संस्था जालना मतदारसंघात आणून दाखविल्या, असे सांगत आ. सतीश चव्हाण आणखी म्हणाले की, यांनी चार निवडणुका अशाच जिंकल्या. फक्त चारच नावे घ्यायची. आई तुळजा भवानी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे... यापलीकडे काही नाही. लोकसभेतही यांचा काहीच परफॉर्ममन्स नाही. पक्षाने आदेश दिल्यास मी खैरेंविरुद्ध निवडणूक लढवायला तयार असल्याची घोषणाही त्यांनी केली. 

विद्यापीठातील गैरव्यवहारावर आवाज उठविणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरूंना त्वरित सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, अशी मागणी करून चव्हाण यांनी विद्यापीठातील गैरव्यवहारप्रकरणी नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे घोषित केले व विद्यापीठात सध्या कायदा पायदळी तुडवून कारभार चालू असल्याचा आरोप केला. विद्यापीठाला कुलगुरूंनी ५० वर्षे मागे नेले अशीही टीका त्यांनी केली.

टॅग्स :Satish Chavanसतीश चव्हाणState Governmentराज्य सरकारreservationआरक्षण