शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळ विस्तारावरून कोणीही नाराज नाही, सर्व आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठीशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 13:01 IST

मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेली जवळीकता शिरसाट यांना मंत्रिपद मिळवून देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही.

औरंगाबाद: शिंदे- फडणवीस सरकारचा बहुप्रतीक्षित विस्तार आज पार पडला. यात शिंदे गट आणि भाजपचेयं प्रत्येकी ९ अशा एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आमदार संजय शिरसाट हे नाराज असल्याची चर्चा आहे. यावर मंत्री संदीपान भुमरे यांनी प्रतिक्रिया देत, कोणीही नाराज नसल्याचे म्हटले आहे. 

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सत्तांतर झाले. ३० जून रोजी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा शपथविधी पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होते. अखेर आज मंत्रिमंडळ विस्ताराचा पहिला टप्पा पार पडला. मात्र, आज झालेल्या मंतीमंडळ विस्तारात संजय शिरसाट यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. यामुळे ते प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. शिरसाट यांच्यासोबत भरत गोगावले देखील नाराज असल्याची माहिती आहे. दुसरीकडे औरंगाबाद जिल्ह्याला तीन मंत्रीपद मिळाली. यात शिंदे गटाचे संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि भाजपच्या अतुल सावे यांचा समावेश आहे. दरम्यान, शपथविधी पार पडल्यानंतर भुमरे यांनी आमच्यातील कोणीही नाराज नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहोत. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तसेचा यानंतरही मंत्रीमंडळ विस्तार होईलच त्यात अनेकांना संधी मिळेल असेही भुमरे म्हणाले. 

शिंदे गटाचा आक्रमक चेहरा मंत्रिमंडळातून नाहीपहिल्या मंतीमंडळ विस्तारात शिंदे गटातून संजय शिरसाट, भरत गोगावले, बच्चू कडू यांची नावं वगळण्यात आली. त्यामुळे हे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे गटात मंत्रिमंडळ विस्तारावरून प्रचंड मतभेद झाल्याची माहिती आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शिंदे गटाचे आणखी एक आमदार संजय शिरसाट शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी शिरसाट यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे समजल्याने त्यांची आणि शिंदे यांची वादावादी झाल्याचे समजते आहे. रात्री शिंदे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडताना देखील शिरसाट यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती, असे वृत्त एबीपी माझा यांनी दिले आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली होती. शिरसाट यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर थेट हल्ला चढत टीकेची झोड उठवली. औरंगाबाद शहरात देखील शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना एकट्याने तोंड दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेली जवळीकता शिरसाट यांना मंत्रिपद मिळवून देणार अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही.

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेSanjay Shirsatसंजय शिरसाटAurangabadऔरंगाबादEknath Shindeएकनाथ शिंदे