शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये यापुढे कोणी यावे व दुकाने बंद करावीत, हे चालणार नाही; जिल्हा व्यापारी महासंघाशी करावी लागणार चर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:32 IST

कोणताही राजकीय पक्ष असो वा संघटना बाजारपेठ बंद पुकारण्यापूर्वी त्यांना जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे.

ठळक मुद्देमहासंघ बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेईल.येत्या आठवड्यात महासंघाची बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर करणार आहे. 

औैरंगाबाद : राजकीय पक्ष, संघटना अधूनमधून राज्य, देशव्यापी बंद पुकारत असतात. तसेच काही गुंडगिरी करणारेही जबरदस्ती करून दुकाने बंद करणे किंवा तोडफोड करण्याचे काम करीत असतात. आता यापुढे कोणी यावे व दुकाने बंद करावीत, असे चालणार नाही. कारण, कोणताही राजकीय पक्ष असो वा संघटना बाजारपेठ बंद पुकारण्यापूर्वी त्यांना जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे. त्यानंतर महासंघ बंदमध्ये सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेईल. यासंदर्भात येत्या आठवड्यात महासंघाची बैठक घेऊन आचारसंहिता जाहीर करणार आहे. 

शहरात मागील पाच महिन्यांत दंगली, दगडफेक, जाळपोळ, आंदोलने यामुळे अनेक दिवस बाजारपेठ बंद राहिली. यात दुकानांचे, गाड्यांचे मोठे नुकसान झाले. शहरात कधी काय होईल, याचा नेम नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या भीतीमुळे बाहेरगावाचे ग्राहक शहरात खरेदीसाठी येणे टाळत आहेत. याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला असून निम्म्याने उलाढाल घटली आहे. 

यासंदर्भात जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, देश व  राज्याचे हित लक्षात घेता, एखाद्या सामाजिक प्रश्नावर किंवा लोकहिताच्या विरोधातील घटनांवर कोणी बाजारपेठ बंद पुकाराला, तर सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवतात आणि ठेवत आली आहेत. मात्र, आता कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा संघटनेला बाजारपेठ बंद ठेवायची असले, तर सर्वप्रथम जिल्हा व्यापारी महासंघासमोर भूमिका मांडावी लागणार आहे. जर महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचा मुद्दा पटला व तो शहराच्या वा देशहिताचा असेल तर महासंघ सर्व व्यापाऱ्यांना दुकाना बंद ठेवण्याचे आवाहन करेल. जर मुद्दा पटला नाही तर महासंघ बाजारपेठ बंद मान्य करणार नाही. यासंदर्भात येत्या आठवडाभरात महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. त्यात या विषयावर आचारसंहिता तयार करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

...तर नुकसानभरपाई वसूल करणार कोणत्या राजकीय पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या बंदच्या काळात दुकाने फोडणे, जाळणे अशा अप्रिय घटना घडल्या, तर त्याची संपूर्ण नुकसानभरपाई त्या पक्षाला किंवा संघटनेला द्यावी लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. न्यायालयीन निकालाचा आधार घेत जिल्हा व्यापारी महासंघ कोणत्याही व्यापाऱ्याचे नुकसान भरून देण्यासाठी न्यायालयात जाऊ शकते.  

टॅग्स :agitationआंदोलनbusinessव्यवसायMarketबाजार