शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गर्भपातासाठी कोर्टात जाण्याची गरज नाही, आता डाॅक्टरच घेणार निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 15:43 IST

No need to go to court for abortion : गरोदरपणाच्या २० ते २४ आठवड्यांदरम्यान गर्भात काही व्यंगांचे निदान झाले तर गर्भपातासाठी पूर्वी न्यायालयात जावे लागत असे

ठळक मुद्दे२४ आठवड्यांवरील गर्भपाताची प्रकरणे मेडिकल बोर्डासमोरआठवडाभरात बोर्डाकडून निकाल आवश्यक

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : गरोदरपणाचे २० आठवडे उलटून गेल्यानंतर अनेकदा गर्भात काही व्यंग असल्याचे निदान होते. अशावेळी पूर्वी गर्भपाताची परवानगी घेण्यासाठी न्यायालयात जावे लागत असे. मात्र, आता २० ते २४ आठवड्यांवरील गर्भपाताचा निर्णय डाॅक्टरच घेऊ शकणार आहेत ( No need to go to court for abortion) तर २४ आठवड्यांवरील गर्भपाताची प्रकरणे मेडिकल बोर्डासमोर ठेवली जातील. बोर्डाकडून त्यावर आठवड्याभरात निर्णय घेतला जाईल ( Medical Board Will Took Decision on Abortion ) . त्यामुळे सुरक्षित गर्भपाताला हातभार लागेल, असे मत स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.

२० ते २४ आठवड्यांवरील गर्भपाताचा निर्णय दोन स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याने घेतला जाईल; पण कोणालाही सर्रास गर्भपात करता येणार नसून, त्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. स्त्रीच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर गंभीर परिणामांची शक्यता, जन्मला येणाऱ्या मुलामध्ये असलेले शारीरिक व्यंग, बलात्कारामुळे राहिलेला गर्भ किंवा फसलेले कुटुंब नियोजन या कारणांसाठी गर्भपात करण्यास मुभा देण्यात आली आहे. गरोदरपणाच्या २० ते २४ आठवड्यांदरम्यान गर्भात काही व्यंगांचे निदान झाले तर गर्भपातासाठी पूर्वी न्यायालयात जावे लागत असे पण आता डाॅक्टरच गर्भपाताची परवानगी देऊ शकणार आहेत.

सुरक्षित गर्भपाताला बळआता २० ते २४ आठवड्यांचे गर्भपात नियमांनुसार ग्राह्य झाले आहेत. २४ आठवड्यांवरील गर्भपातासाठीही समिती राहील. त्यामुळे न्यायालयात जावे लागणार नाही. १२ ऑक्टोबरला शासनाने यासंदर्भात नियम जारी केले आहेत. त्यामुळे सुरक्षित गर्भपाताला हातभार लागेल, अशी आशा आहे.- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, प्रसूती व स्त्रीरोग विभागप्रमुख

आठवडाभरात बोर्डाकडून निकाल आवश्यकआता २० ते २४ आठवड्यांवरील गर्भपातासाठी न्यायालयात जाण्याची गरज नाही. डाॅक्टरच परवानगी देतील. २४ आठवड्यांवरील गर्भपाताची प्रकरणे शासनाच्या मेडिकल बोर्डाकडे जातील. त्यांच्याकडून हे प्रकरण आठवड्याभरात निकाली काढले जाईल.-डाॅ. राजेंद्रसिंग परदेशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र स्त्रीरोगतज्ज्ञ संघटना

टॅग्स :Healthआरोग्यPregnancyप्रेग्नंसीAurangabadऔरंगाबाद