शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत गुंतवणुकीच्या घोषणाच; 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' अंतगर्त एकही करार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 13:53 IST

शासनासोबत झालेल्या सामंजस्य करारामध्ये १२ पैकी एकाही कंपनीने औरंगाबादेत गुंतवणुकीचा करार केलेला नाही.

ठळक मुद्दे‘डीएमआयसी’तील पायाभूत सुविधांचा उद्योगांसाठी प्राधान्याने विचार व्हायला हवा

औरंगाबाद : शेंद्रा- बिडकीन ‘डीएमआयसी’ या औद्योगिक वसाहतीत गुंतवणूक करण्यासाठी पाहणी करून गेलेल्या कंपन्या लवकरच येथे येतील, अशी अपेक्षा होती; परंतु मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत शासनासोबत झालेल्या सामंजस्य करारामध्ये १२ पैकी एकाही कंपनीने औरंगाबादेत गुंतवणुकीचा करार केलेला नाही. त्यामुळे अनेक मोठमोठ्या कंपन्यांच्या येथे येणार म्हणून केवळ घोषणाच ठरल्या की काय, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. 

यासंदर्भात येथील उद्योग क्षेत्रातही नाराजीचा सूर उमटला आहे. ‘लॉकडाऊन’नंतर आता गुंतवणुकीचा ओघ सुरू झाला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही बाब निश्चित चांगली असली, तरी ‘डीएमआयसी’च्या पार्श्वभूमीवर मॅग्नेटिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत बहुराष्ट्रीय कंपन्यांसोबत केलेल्या कराराच्या वेळी एक-दोन कंपन्यांचा विचार औरंगाबादसाठी करायला हरकत नव्हती, असे मत येथील उद्योजकांनी व्यक्त केले आहे. 

औरंगाबादेत रशिया येथील एनएलएमके, चीन येथील बाहे मेडिकल या कंपन्यांनी मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. डेटॉल, हार्पिक उत्पादन असलेला रेकिट बेन्कीझर ग्रुप गुंतवणुकीसाठी उत्सुक आहे. किया मोटार्सने येथे पाहणी केली आहे. औषधनिर्माण, अन्नप्रक्रिया, संरक्षण क्षेत्रात कार्यरत कंपन्यांशी चर्चा सध्या सुरू आहे. तथापि, हे उद्योग येथे येण्यासाठी सध्यापेक्षा वेगळे काय करता येईल, याचाही अभ्यास करावा लागेल; अन्यथा, ‘डीएमआयसी’मध्ये तयार असलेली ३ हजार एकर जागा आणि भविष्यात येणारी ७ हजार एकर जागा विकण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील, अशा भावना उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत. 

औरंगाबादचा विचार नक्कीच -सुभाष देसाई  राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले की, पालकमंत्री या नात्याने आपण नेहमीच औरंगाबादला प्राधान्य दिले आहे. येथे आपण व्हायरॉलॉजी लॅब आणली. कोविड हॉस्पिटल उभारले. कालचे जे फक्त १२ सामंजस्य करार झालेत, असे असंख्य करार होणार आहेत. त्यात औरंगाबादचासुद्धा नंबर आहे. हे सर्व खासगी उद्योग आहेत. गुंतवणूदार हे स्थळ निवडत असतात. या पुढच्या काळात औरंगाबादेत जास्तीत जास्त उद्योग आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. 

आपण कुठे कमी पडलो, याचा विचार व्हावा ‘सीआयआय’ या उद्योग संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले की, कालच्या सामंजस्य करारामध्ये औरंगाबादचा समावेश नाही. हे ‘डीएमआयसी’च्या दृष्टीने निराशाजनक असले, तरी आपण कुठे कमी पडलो आहोत, याचा विचार केला पाहिजे. औरंगाबाद हे आॅटोमोबाईल हब आहे. त्या दृष्टिकोनातून ग्रेट वॉल ही चीनची आॅटोमोटिव्ह कंपनी औरंगाबादेत येण्यास हरकत नव्हती. दुसरीकडे, महाराष्ट्रात डेटा सेंटरच्या इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात येत आहेत. यासाठी आपण स्ट्राँग फायबर कनेक्शन जर घेऊन येऊ शकलो, तर आयटी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबी येथे येऊ शकतात. या स्पर्धेत आपण कुठे कमी पडत आहोत, हे तपासून प्रयत्न करायला हवेत. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMaharashtraमहाराष्ट्रbusinessव्यवसाय