शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोणतेही सरकार, कोणीही प्रधानमंत्री असो, कोणीच संविधान बदलू शकत नाही: नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 20:06 IST

स्मार्ट शहर नव्हे तर खेडी सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे: नितीन गडकरी

सिल्लोड ( छत्रपती संभाजीनगर) : कॉँग्रेस लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहे, भाजप सत्तेत आली तर प्रधानमंत्री मोदी संविधान बदलतील. मात्र, कोणतेही सरकार आले अन् कोणीही प्रधानमंत्री झाले तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानातील मूलभूत तत्व बदलूच शकत नाही. फक्त 'पार्ट-बी' मध्ये  दुरुस्ती होऊ शकते. त्यामुळे संविधान बदलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यामुळे काँग्रेसच्या अपप्रचाराला बळी न पडता भाजपचे जालना लोकसभा मतदार संघाचे  उमेदवार रावसाहेब दानवे यांना निवडून द्या असे आवाहन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

सिल्लोड येथे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता नीलम चौकातील जाहीर सभेत ते बोलत होते. गडकरी यांनी काँग्रेसचा समाचार घेतला, काँग्रेसने ८० वेळा चुकीच्या पद्धतीने संविधानाची मोडतोड केली. भाजप सरकार कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र काँग्रेस भाजपवर खोटे आरोप करत आहे. भाजप मुस्लिमांना पाकिस्तानमध्ये पाठवतील असे म्हणत आहे. मात्र, त्यात तथ्य नाही देशाचा विकास करणे हाच प्रधानमंत्री मोदी यांचा ध्यास आहे. तरुणांना रोजगार देणे, शेतकरी अन्नदाता सोबत इंधनदाता, ऊर्जादाता कसा होईल यासाठी भाजप सरकार काम करत आहे. स्मार्ट शहर नव्हे तर खेडी सुद्धा स्मार्ट झाली पाहिजे ही संकल्पना प्रधानमंत्री मोदींची आहे, असेही गडकरी म्हणाले.

यावेळी रावसाहेब दानवे, अब्दुल सत्तार यांची भाषणे झाली. मंचावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अब्दुल समीर, विजय औताडे, इद्रिस मुलतानी, सांडू पा. लोखंडे, भाजप नेते सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे,अर्जुन पा गाढे, श्रीराम महाजन, भाजपचे तालुका अध्यक्ष अशोक गरुड, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष देविदास लोखंडे,  मकरंद कोरडे, विनोद मंडलेचा आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Nitin Gadkariनितीन गडकरी