शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

लढाईमध्ये गटबाजी चालत नाही : मुख्यमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 19:35 IST

कोरोना  विषाणू जातपात, धर्म आणि पक्ष बघत नाही. ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, लढाईमध्ये गट आणि तटबाजी चालत नाही. अशा वेळेला एकत्रितपणे लढणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. 

ठळक मुद्देकोविड हॉस्पिटल आणि विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे ऑनलाईन उद्घाटनएमआयडीसीने उभारले २५६ खाटांचे कोविड हॉस्पिटलहॉस्पिटलमध्ये १२८ खाटांना आॅक्सिजन सुविधा उपलब्ध

औरंगाबाद : शिवसेनेच्या मंत्र्याने उद्योग खात्यामार्फत जरी कोविड हॉस्पिटल उभारणीसाठी काम केले असले तरी कौतुक किती करायचे. आता तुझे-माझे असा मुद्दाच नाही. आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलो आहोत. कोरोना  विषाणू जातपात, धर्म आणि पक्ष बघत नाही. ही लढाई सर्वांनी मिळून लढायची आहे, लढाईमध्ये गट आणि तटबाजी चालत नाही. अशा वेळेला एकत्रितपणे लढणे महत्त्वाचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. 

एमआयडीसीमार्फत उभारण्यात आलेले चिकलठाण्यातील सिपेट कंपनीतील कोविड हॉस्पिटल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्रयोगशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतून आॅनलाईन कळ दाबून केले.  यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची ऑनलाईन उपस्थिती होती. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री आदिती तटकरे, रोहयोमंत्री संदीपान भुमरे, राज्यममंत्री अब्दुल सत्तार, खा. भागवत कराड, आ. अतुल सावे, आ. अंबादास दानवे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, एमआयडीसीचे सीईओ डॉ. अन्बलगन, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय आदींची उपस्थिती होती. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आता कोरोनासोबत जगायला शिकले पाहिजे. संकट आल्यावर डोळे उघडतात. कोरोनाने डोळे उघडले असून, कसे जगावे हे शिकविले आहे. राज्यात एकही जिल्हा आरोग्यसेवेविना राहू नये, अशी इच्छा आहे. उद्योग खात्याने महिनारात कोविड हॉस्पिटल उभारले, त्याचे कौतुक कुणी करणार नाही. आपणच आपले कौतुक केले पाहिजे.  मार्च २०२० पासून आजपर्यंत राज्यात सरासरी दररोज एक  विषाणू प्रयोगशाळेची उभारणी होत आहे. राज्यात शंभराहून अधिक विषाणू तपासणी प्रयोगशाळा  लवकरच होतील. प्रसंगी आरोग्यमंत्री टोपे, राज्यमंत्री देशमुख यांनी आॅनलाईन मार्गदर्शन केले, तसेच पालकमंत्री देसाई, राज्यमंत्री तटकरे यांनी एमआयडीसी यंत्रणेचे कौतुक केले. 

हॉस्पिटलमध्ये येण्याची वेळ येऊ देऊ नका सर्व प्रशासकीय यंत्रणा जिवावर उदार होऊन कोरोनाशी लढत आहेत. ही लढाई सोपी नाही; परंतु असे असले तरी हॉस्पिटलपर्यंत येण्याची वेळ कुणावर येऊ नये, यासाठी जनजागृती करावी. ७ वर्षांपासून ९० वर्षांपर्यंतचे रुग्ण बरे झाल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

२५६ खाटांचे कोविड हॉस्पिटल एमआयडीसीने उभारलेल्या २५६ खाटांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये १२८ खाटांना आॅक्सिजन सुविधा उपलब्ध आहे. याबरोबरच आयसीयू, एक्स-रे आदी आवश्यक सुविधाही याठिकाणी आहेत. या रुग्णालयासाठी लागणारे ११५ मनुष्यबळ राष्ट्रीय आरोग्य अभियानातून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. विद्यापीठात विषाणू तपासणी प्रयोगशाळा व संशोधन केंद्र कायमस्वरूपी सुरू करण्यात आले आहे. डीएमआयसीतील ‘आॅरिक सिटी’च्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून प्रयोगशाळा उभारली आहे. संसर्गजन्य रुग्णालय, विषाणू तपासणी प्रयोगशाळेची देखभाल प्रशासनामार्फत करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादUddhav Thackerayउद्धव ठाकरेcorona virusकोरोना वायरस बातम्या