शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वीज गेली, उकाड्याने हैराण आहात; मग महावितरणला व्हॉटस्ॲपद्वारे करा तक्रार

By साहेबराव हिवराळे | Updated: April 4, 2024 11:40 IST

महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा : ग्राहक हिताला प्राधान्य देणार

छत्रपती संभाजीनगर : उन्हाळ्यात उकाडा नको तर ‘वीज समस्याचे समाधान हवे; मग महावितरणला व्हॉटस्ॲप’ करा. महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा देणारी कंपनी आहे. महावितरण ही ग्राहकाभिमुख सेवा देणारी कंपनी असून, ग्राहकहिताला प्राधान्य देणार असे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल गुप्ता यांच्या संकल्पनेतून वीजग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र व्हॉटस्ॲप क्रमांक देण्यात आला आहे.

आता मराठवाड्यातील ग्राहकांनी आपल्या विजेच्या समस्या थेट ८४८५८९९३९९ या व्हॉटस्ॲप क्रमांकावर पाठवाव्यात. या तक्रारी संबंधित विभागांच्या प्रमुखांना पाठवून तत्काळ निराकरण करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील छत्रपती संंभाजीनगर शहर व ग्रामीण, जालना, लातूर, धाराशिव, बीड, नांदेड, हिंगोली व परभणी जिल्ह्यांसाठी व्हॉटस्ॲप मोबाइल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या क्रमांकावर नवीन वीजजोडणी मिळण्यात विलंब, वीज बिल दुरुस्ती, नादुरुस्त रोहित्र मिळण्यास विलंब, वीजपुरवठा खंडित तक्रारी, वीजचोरीसंबंधित माहिती, महावितरण कर्मचाऱ्यांविषयी असलेल्या तक्रारी व विजेची कामे करण्यासाठी पैशांची मागणी होत असल्याची तक्रार तसेच महावितरणची वीजतार तुटलेली आहे, तारेला झोल किंवा तार जमिनीवर लोंबकळत आहे, फ्युज पेट्या किंवा फिडर पिलरचे झाकण उघडे किंवा तुटलेले आहे, रोहित्रांचे कुंपण उघडे आहे, खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघड्यावर आहे, आदी स्वरूपांची माहिती, तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉटस्ॲप मोबाइल क्रमांकावर नागरिकांना पाठविता येणार आहे. 

वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत. या क्रमांकावर नागरिकांनी कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस्ॲपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस्ॲप नाहीत, त्यांनी एसएमएसद्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.

व्हॉटस्ॲपद्वारेच येणार दुरुस्तीनंतरचे छायाचित्रव्हॉटस्ॲपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह तक्रार संबंधित मंडळ व विभागीय कार्यालयात पाठवून त्याप्रमाणे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधित तक्रारदारांना व्हॉटस्ॲपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टिंगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधित तक्रारदारांना कळविण्यात येणार आहे.- राहुल गुप्ता, सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक कार्यालय

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादmahavitaranमहावितरणelectricityवीज