शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रौत्सवात ना डीजे, ना ढोल; गरबा, दांडियाला नागरिक मुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:42 IST

शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्याची मंडळांची ग्वाही

ठळक मुद्देमंडळांचे यंदा सामाजिक उपक्रम रोजगारावर परिणाम

औरंगाबाद : अधिक मास संपून उद्या शनिवारपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जसा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, तशीच सार्वजनिक  मंडळे नवरात्रौत्सव प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करणार आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांची गरबा खेळण्याची ५९ वर्षांची परंपरा यंदा खंडित करावी लागत आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळे ६ ते १० फुटांपेक्षा जास्त देवीची मूर्ती बसवत नसत. यंदा मूर्तीची उंची ४ फूटच ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या परवानगीनुसार रस्त्यावर, कडेला किंवा रिकाम्या जागेत मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात आले आहेत. यंदा नवरात्रात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे मंडप टाकताना त्याची काळजी घेण्यात आली आहे. मंडपात भाविक व कार्यकर्ते यांच्यासाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोना व शासनाने घालून दिलेल्या अटी, नियमामुळे सार्वजनिक मंडळाची संख्या घटली आहे. काही जुन्या मंडळांनी परंपरा चालून ठेवण्यासाठी देवीची स्थपना करण्याचा निर्णय दोन दिवस अगोदर घेतला आहे. 

मंडळे घेणार खबरदारीशहर व परिसरातील विविध नवरात्रौत्सव मंडळांनी कोरोनाचा संसर्ग टाकण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमनाचे पालन करण्याचे ठरवले आहे. अनेक ठिकाणी लहान मंडप उभारण्यात आला आहे. जास्तीत जास्त ५ कार्यकर्ते बसतील एवढीच जागा ठेवण्यात आली आहे. दररोज मंडपांचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. आरती व भजनासाठी येणाऱ्यांना सॅनिटायझर ठेवण्यात येणार आहे.

मंडळांचे यंदा सामाजिक उपक्रम कोरोनामुळे सरकारने सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना आरोग्य विषयक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मंडळे फक्त देवीची मूर्तीची स्थापणार आहेत. सकाळी व संध्याकाळी देवीची आरती व दुपारी भजन कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. काही मंडळे रक्तदान शिबीर घेणार आहेत.

रोजगारावर परिणामनवरात्रौत्सवात कर्णपुरा यात्रेत दीड हजार लोकांना हंगामी रोजगार मिळतो. त्यातून १२ कोटींची उलाढाल होते. यंदा यात्रा रद्द करण्यात आल्याने हा व्यवसाय बुडाला आहे. गरबा व दांडियाच्या आयोजनात ४ ते ५ कोटींची उलाढाल होत असते. ती यंदा होणार नाही.  

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अजूनही धार्मिक स्थळे बंद आहेत. कोरोनामुळे नवरात्रौत्सवात गरबा आयोजनाला परवानगी नाही. विनापरवानगी गरब्याचे आयोजन करणाऱ्या मंडळाचे अध्यक्ष आणि सचिवांवर गुन्हे दाखल केले जातील.  -डॉ. निखिल गुप्ता, पोलीस आयुक्त

टॅग्स :Navratriनवरात्रीAurangabadऔरंगाबाद