शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नितीन आगे हत्या प्रकरण : औरंगाबाद खंडपीठात दाखल असलेली जनहित याचिका निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 15:18 IST

 नितीन आगे हत्या प्रकरण खटल्याबाबत संजय भालेराव यांनी एका सामाजिक संस्थेतर्फे दाखल केलेली जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढली. 

औरंगाबाद - नितीन आगे हत्या प्रकरण खटल्याबाबत संजय भालेराव यांनी एका सामाजिक संस्थेतर्फे दाखल केलेली जनहित याचिका औरंगाबाद खंडपीठाने निकाली काढली.  या प्रकरणी शासन अपील करणार असून जनहित याचिकेमधील सर्व मागण्या यात आहेत, हे सरकारी वकिलाचे म्हणणे ग्राह्य धरत खंडपीठाने ही याचिका निकाली काढली आहे. राज्य शासनाचे या प्रकरणातील अपील तयार असून ते दाखल लवकरच खंडपीठात दाखल होणार आहे.

नितीन आगे हत्याप्रकरणी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती जनहित याचिका

नितीन आगे खून खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करणारा अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, नव्याने तपास करून खटला मुंबईतील सत्र न्यायालयात चालविला जावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका सोमवारी (11 डिसेंबर) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी, अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका करण्यात आली होती. याचिकेवर लवकरच प्राथमिक सुनावणी अपेक्षित आहे. सरकारी वकील, साक्षीदारांना संरक्षण द्यावे, नितीन ज्या कॉलेजमध्ये शिकत होता, त्या कॉलेज ट्रस्टींना, मुख्याध्यापकांना सहआरोपी करावे, अशी विनंतीही याचिकेत होती. जामखेडचा नितीन आगे हा बारावीतील विद्यार्थी होता. उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला.

९ आरोपींची सुटकासरकारी वकिलांनी २६ जणांना साक्षीदार केले. मात्र, त्यापैकी १३ प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. त्यामुळे अहमदनगर सत्र न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी ९ आरोपींची सुटका केली.