शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद शहरात शुक्रवार, शनिवारी निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 23:02 IST

पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे१२ तासांचे शटडाऊन : मान्सूनपूर्व विविध कामांचा समावेश

औरंगाबाद : पावसाळा सुरू झाला तरी शहरात भीषण पाणीटंचाई सुरूच आहे. मृग नक्षत्राचे दोन आठवडे उलटले तरी पावसाचा थांगपत्ता नाही. त्यातच शुक्रवार २१ जून रोजी महापालिकेने पाणीपुरवठ्यात तब्बल १२ तासांचे शटडाऊन घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शुक्रवार, शनिवार शहरात पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. खंडण काळात जायकवाडी, फारोळा येथे व्यापक प्रमाणात दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.जायकवाडी, फारोळा येथे मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी किमान १२ तासांचे शटडाऊन द्यावे, अशी विनंती वीज वितरण कंपनीने महापालिकेकडे एप्रिल महिन्यात केली होती. ऐन उन्हाळ्यात मोठे शटडाऊन घेतल्यास शहरात पाण्यासाठी बरीच ओरड होईल, या भीतीने मनपा प्रशासनाने आजपर्यंत शटडाऊनला परवानगी दिली नव्हती. यंदा पावसाळा लांबला आहे. त्यामुळे २१ जून रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे. वीज कंपनी जायकवाडी, फारोळा येथे मनपाला २४ तास वीज देण्यासाठी यंत्रणा उभारणार आहे. येथील ३३ के.व्ही. केंद्राचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. वीज कंपनीच्या खंडण काळात महापालिकाही अनेक कामे करणार आहे. ठिकठिकाणी असलेल्या गळत्या थांबविण्यात येणार आहेत. यंत्र सामुग्रीचीही दुरुस्ती या १२ तासांत होणार आहे. दुरुस्तीचे काम शुक्रवारी रात्री उशिरा संपल्यावर जायकवाडी येथून एकानंतर एक पाण्याचा उपसा करणाऱ्या मोटारी सुरूकरण्यात येतील. शहरात पहाटे पाणी येण्यास सुरुवात होईल. शनिवारी दिवसभर पाण्याच्या टाक्या भरण्यात येतील. शक्य झाल्यास काही वसाहतींना याच दिवशी पाणी देण्याचा प्रयत्न प्रशासन करणार असल्याचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कळविले. रविवारपासून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल. दोन दिवस औरंगाबादकरांना निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाwater shortageपाणीकपात